नादेंड : पोखर्णी कृषी विज्ञान केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाउनच्या काळात डायल कॉन्फरन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. तसेच घरातील मुले, वृद्धांची काळजी घेणे अपेक्षित आहे. जनावरापासून हा रोग होतो, असा गैरसमज शेतकऱ्यांत झाला आहे. परंतु तसे काही आढळले नसल्यामुळे काळजी करु नये असे आवाहन करण्यत आले आहे. अशा संपर्कामुळे शेतकरी अथवा तज्ज्ञांचा भेट न होता, मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छतेला द्यावे महत्व
जनावरांची स्वच्छता ठेवा, घरांची स्वच्छता ठेवा, हात वारंवार साबणाने धुवा, सार्वजनिक जागेमध्ये थुंकायचे नाही, तोंडावर व नाकावर रुमाल बांधायचा. आणि जे काही कृषी अवजारे आहेत वखर, नांगर, मोगडा, ट्रॅक्टर यांना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या, अशी काळजी खरीप हंगामामध्ये घ्यायची आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येइल, असे मार्गदर्शन वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले.
शेतीची कामे करताना काय काळजी घ्यावी
हळदीला बेणे प्रक्रिया करावी. हळद लागवड करताना शेणखत वापरावे. हळदीचे बेणे कोणते चांगले आहे ते बघून त्याची निवड करावी. हळद पिकासाठी पूर्व मशागत कशी करावी, हळदीवर करपा रोग आल्यावर काय काळजी घ्यावी कापसाचे वाण कोणते लावावे, लागवड कधी करावी, कापसावर बोंडअळी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
हेही वाचलेच पाहिजे.....व्हिडिओ : ‘चीन म्हणजे कोरोनाची जननी’; भारूडातून जागृती
सोयाबीनविषयी मार्गदर्शन
सोयाबीनला बीज प्रक्रिया करण्यासह सोयाबीनचे बियाणे कोणते पेरावे याबाबत मार्गदर्शन पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये तीस गावच्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल बनसोड आणि कार्यक्रम सहाय्यक दशरथ वाळवंटे यांनी केले.
महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८८९ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सत्यभामा एजगे व विश्वनाथ एजगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी. उषा साखरे, गंगा खाखरे, जयश्री देवणे, नंदा कहाळे, मयुरी येजगे, माधुरी शेळके, शिवा संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर पत्रे, नागेश येजगे, बाळू खाखरे, नंदू देवणे, दीपक खाखरे, नितीन देवणे, निखिल देवणे, अभिषेक कापसे, गंगाधर कहाळे आदींच्या उपस्थित जयंती साजरी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.