पेरणीसाठी शेतकऱ्यांना हवी तत्काळ मदत.... कोण म्हणाले ते वाचा

NND15KJP01.jpg
NND15KJP01.jpg
Updated on

नांदेड : शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी पेरणीसाठी प्रति हेक्टर २५ हजार रूपये बिनव्याजी कर्ज द्यावे. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांना बी, बियाणे व खते कृषी विभागाच्या माध्यमातून थेट बांधावर उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी निवदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

बिनव्याजी २५ हजार रुपये द्यावे
अतिवृष्टीमुळे मागच्या वर्षी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील शेतकऱ्याच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बीसाठी तर जिल्ह्यांत पीकविमा भरून घेण्यासाठी कंपनीच पुढे न आल्याने विमा मिळण्याचीही शक्यता नाहीच. 
राज्य शासनाने या बाबींचा विचार करून विनाअट बिनव्याजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर कर्ज बँकेमार्फत शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून द्यावे. 

गर्दी टाळण्यासाठी बांधावर खते - बियाणे द्यावे
खत, बी, बियाणांची विक्री सुरु झाल्यानंतर दर वर्षीचा अनुभव पाहता  कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ शकते, गर्दीमुळे शेतकऱ्यांना कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव होण्याच मोठा धोका आहे. हे सर्व टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी विभागाच्या माध्यमातून खते, बी, बियाणे उपलब्ध करून देऊन शेतकऱ्याना दिलासा द्यावा. शेतकऱ्याला खरीप हंगामाच्या पेरणीला अजून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे. यासाठी वेळीच योग्य पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही यावेळी भागवत देवसरकर यांनी केली आहे.

गरजु मुलांना आवश्यक साहित्य वाटप
सरंक्षण कक्ष, नांदेड चाईल्ड लाईन १०९८, परिवार प्रतिष्ठान नांदेड यांच्यावतीने १८ वर्षा खालील १६ बालकांना लागणारे गरजेचे साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात गरजूंना बकेट, टॉवेल, अंडरगार्डमेंट, सनिटरी पॅड, टूथपेस्ट, ब्रश, साबण, मास्क, लहान बालकांसाठी दुध बाटली, बिस्कीट, खोबरेल तेल, कंगावा, इ. साहित्य वाटप करण्यात आले. 

गरजूंना मदतीचे आवाहन 
ॲड. सावित्री जोशी यांनी मुलांच्या शिक्षणाचे महत्व यावर प्रकाश टाकला. तर संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी बालकांचे शिक्षण, आरोग्य यावर मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. जय संतोषी माता मंडळाच्या जयस्वाल यांनी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले. नांदेड चाईल्ड लाईनच्या नीता राजभोज यांनी चाईल्ड लाईन १०९८ चे कामाचे स्वरूप १०९८ हेल्पलाईन विषयी
माहिती दिली. परिवार प्रतिष्ठान डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी मुलांचे शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, मानसिक
स्थिती व वास्तविक परिस्थितीचे अवलोकन करून दिले.

लॉकडाउनच्या काळात सुटले व्यसन
लॉकडाऊनच्या काळात व्यसन सोडलेल्या मजुरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी श्री. माळाकोळीकर चाईल्ड लाईन १०९८ चे केंद्र समन्वयक बालाजी आलेवार, टिम मेंबर आकाश मोरे, पोलीस विभागाकडून श्री. कवडे व देशमुख तसेच ४५ श्रमिक उपस्थिती होते. सहाय्य व सांभाळ करण्यासाठी नांदेड चाईल्ड लाईन १०९८ सेवा २४ तास चालणारी तत्पर असून ते १८ वर्षातील मुलांसाठी मोफत आपत्कालीन राष्ट्रीय फोन सेवा वाहिनी आहे. मुलांच्या संदर्भाने विविध समस्या सांगण्याचे आवाहन अशा विविध अडचणी सांगून संकट ग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी आपल्या समस्येची नोंद १०९८ या फोनसेवेशी संपर्क करून सागता येतील. असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.