Dhangar Reservation : मराठवाड्यात पुन्हा उपोषण; धनगर समाजाला 'एसटी'तून आरक्षण देण्याची मागणी

मागील पाच दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू असून अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. मागच्या तीस वर्षांपासून धनगर बांधवांची एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आहे. मात्र सरकारने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा बीडमधील उपोषणकर्त्या धनगर बांधवांनी घेतला आहे.
Dhangar Reservation
Dhangar Reservationesakal

Beed News : मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आरक्षणावरुन वाद उभा राहिला आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु झालाय. त्यातच मागील महिन्यात लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या हक्कासाठी लढा उभा केल्याने परिस्थिती बिघडली होती.

लक्ष्मण हाके यांनी सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीविरोधात आंदोलन केलं होतं. याशिवाय कुणबी प्रमाणपत्र वाटपात गैरव्यवहार होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता. मात्र आता धनगर समाज एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे.

गुरुवारी राज्यभर धनगर बांधवांनी रस्त्यावर मेंढ्या उतरवत आंदोलन पुकारलं आहे. बीडमध्ये मागच्या पाच दिवसांपासून धनगर बांधवांचं उपोषण सुरु आहे. समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीने आता जोर धरला आहे.

Dhangar Reservation
Share Market मध्ये गुंतवणूक करत असाल, तर सावधान! 13 बँक खात्यांव्दारे व्यावसायिकाला अडीच कोटींचा घातला गंडा

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी घेऊन बीडमध्ये धनगर समाज बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये आकाश निर्मळ यांच्यासह धनगर बांधवांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Dhangar Reservation
Indian Team Meet PM Modi: टीम इंडियाच्या खेळाडूंनी PM मोदींची घेतली सदिच्छा भेट, जाणून घ्या, पंतप्रधान निवासाची 'ही' खास वैशिष्ट्ये

मागील पाच दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू असून अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. मागच्या तीस वर्षांपासून धनगर बांधवांची एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आहे. मात्र सरकारने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा बीडमधील उपोषणकर्त्या धनगर बांधवांनी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com