Maratha Reservation : आरक्षण मागणीसाठी कळंब तालुक्यातील इटकूरात आमरण उपोषणाला प्रारंभ

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे,या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यानी दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा लढा सुरू
fast to death protest strike in Itkur Kalamb maratha reservation politics marathi news
fast to death protest strike in Itkur Kalamb maratha reservation politics marathi newsSakal
Updated on

कळंब : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे,या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यानी दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा लढा सुरू केला आहे.त्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून बोलण्या इतकीही त्यांच्यात ताकत उरली नाही.त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली असून जरांगे यांच्या आंदोलनाला कळंब तालुक्यात वाढता पाठिंबा मिळत असून संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे.

आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील इटकूर व परिसरातील १० ते १५ तरुण आमरण उपोषणाला रविवार (ता.२९) पासून बसले आहेत. कळंब तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली असून गावोगावी राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

तालुक्यातील इटकूर व परिसरातील मराठा तरुणांनी आमरण उपोषणाला बसण्यासाठी इटकूर हे केंद्रबिंदू मानले आहे.गावातील समाजाच्या वतीने प्रमुख मार्गावरून पदयात्रा रॅली काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यात महिला,लहान मुले,मुलीचा मोठा सहभाग होता.गावातील ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाचे स्थळ निवडण्यात आले आहे.आमरण उपोषणाला गावातील व परिसरातील १० ते १५ मराठा तरुण बसले आहेत.

एसटी बसवरील जाहिरात फलकाला आंदोलन कर्त्यानी काळे फासले एसटी कळंब आगारातील उभ्या असलेल्या एसटी बस वरील शासनाच्या जाहिरात फलकाला काळे फसत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.हा प्रकार शनिवार (ता.२८) रात्री घडला.

सोमवार (ता.३०) कळंब शहर बंदी हाक

आरक्षण मागणीसाठी आंदोलनाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असून सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी कळंब बंद ठेवण्याची हाक दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()