किनगाव : पिता पुत्राचा घरगुती भांडणाचा वाद विकोपाला गेला, दरम्यान आपणास जीवानशी मारेल या भीतीने बापाने आपल्या मुलाचा गळा आवळून खुन केल्याची घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील जढाळा येथील कृष्णा शिवाजी संगणगीरे ( 29 वर्ष ) व त्यांचे वडील शिवाजी विश्वनाथ संगणगीरे ( 53 वर्ष ) यांच्यामध्ये घरगुती कारणावरून 29 ऑगस्ट रोजी वादावादी झाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले व शिवाजी संगणगीरे यांनी हातात काठी घेतली व मारहाण चालू केली त्यात मुलाच्या डोक्यात जबर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला.