पाचोड : दिवाळी सण अवघ्या पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाच्या पार्श्वभूमीवर पाचोडसह (ता. पैठण) परिसरातील सर्व बाजारपेठा पूर्णतः सजल्या आहेत. खरेदीसाठी नागरिक बाजारात गर्दी करू लागले आहेत. परिणामी बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळीचे साहित्य खरेदीसाठी दुकानांत गर्दी दिसून येत आहे.