लातूर : लातूर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यामुळे येथे दुचाकींचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. 2019 मध्ये तब्बल 25 हजार दुचाकी रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे लातुरातील रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकींचा आकडा चार लाखांच्या घरात पोचला आहे. एकूण वाहनांपैकी दुचाकींचे प्रमाण जास्त असल्यामुळे लातूरची ओळख दुचाकींचे शहर अशी बनली आहे.
शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लातुरातील अनेक घरांत सध्या दोन दुचाकी पाहायला मिळत आहेत. याबरोबरच बाहेरून येथे शिकायला येणारे विद्यार्थी दुचाकींचा सर्रास वापर करत आहेत. त्यामुळे सायकलवरून महाविद्यालयात जाणे जवळजवळ इतिहासजमा झाले आहे. माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही शाळेत आणि शिकवण्यांना जाताना दुचाकी वापरत आहेत. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातील दुचाकींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत चांगलेच वाढले आहे. म्हणूनच सध्या शहरातील रस्त्यांवर तीन लाख 89 हजार 51 दुचाकी धावत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा - साई जन्मभूमीचा विकास हवा, त्यावर वाद नको
शहरात आणि जिल्ह्यात मागील वर्षभरात दुचाकी, कार, ट्रॅक्टर, टो-रिक्षा, व्हॅन यासह एकूण 32 हजार 181 वाहने रस्त्यांवर उतरली आहेत. यात तब्बल 24 हजार 936 दुचाकींचा समावेश आहे. तर एकूण वाहने पाच लाख 22 हजार 374 असून यात 3 लाख 89 हजार 51 दुचाकींचा समावेश आहे. त्यामुळे लातुरात दुचाकींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याखालोखाल कार, रिक्षा, ट्रॅक्टर अशा वाहनांची संख्या पाहायला मिळत आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील म्हणाले, सध्या शैक्षणिक केंद्र म्हणून लातूरकडे पाहिले जाते. याबरोबरच मध्यमवर्गीय नागरिक येथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे लातूर शहर आणि जिल्ह्यात दुचाकींचे प्रमाण वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असली तरी वाहने काळजीपूर्वक चालविणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. रस्ते अपघातात मागील वर्षभरात 290 लोकांचे मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारीसुद्धा चिंताजनक आहे. हे प्रत्येक वाहनचालकांनी लक्षात ठेवावे.
जानेवारी | 3038 |
फेब्रुवारी | 2110 |
मार्च | 2416 |
एप्रिल | 2973 |
मे | 2782 |
जून | 2488 |
जुलै | 2470 |
ऑगस्ट | 1996 |
सप्टेंबर | 2028 |
ऑक्टोबर | 2906 |
नोव्हेंबर | 4488 |
डिसेंबर | 2486 |
दुचाकी | 3 लाख 89 हजार 051 |
कार | 39 हजार 717 |
रिक्षा | 14 हजार 448 |
स्कूलबस | 589 |
ट्रक | 9 हजार 019 |
टॅंकर | 414 |
ट्रॅक्टर | 17 हजार 110 |
जेसीबी | 881 |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.