वसमत : वसमत येथील ठेवीदाराच्या ठेवीची मुदत संपल्यानंतरही त्यांना पैसे न दिल्याच्या कारणावरून वसमतच्या महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर (mahalaxmi Mahila Nagari Sahakari Patsanstha)वमत शहर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील काळीपेठ भागातील गोविंदराव व्यंकटराव इपलवार यांनी वसमतच्या महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये काही रक्कम गुंतवली होती. यावेळी त्यांना बँकेच्या(Bank) संचालिकांनी तसेच व्यवस्थापकाने जादा व्याज दर देण्याचे सांगितले होते.
त्यानुसार त्यांनी ठेवी व आरडी अशा विविध तीन खात्यांमधून सुमारे ८ लाख रुपयांची रक्कम गुंतवली होती.त्यांनतर सदर ठेवी व आरडीची मुदत संपल्यानंतर इपलकवार यांनी पैशाची मागणी केली होती. त्यानंतर बँकेकडून त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये लेखी पत्र देखील दिले होते. त्यानंतर त्यांनी वारंवार पाठपुरावा केला मात्र त्यांना पैसे मिळालेच नाही. त्यामुळे इपकलवार यांनी थेट वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर जमादार भगीरथ सवंडकर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला.त्या अहवालानुसार आज वसमत शहर पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा विवेक बागल, व्यवस्थापक सागर उर्फ गजानन बोचकरी, उपाध्यक्ष कावेरी रत्नाकर अडशिरे, संचालिका शारदा अशोक खराटे, वर्षा लक्ष्मण गोंटलवार, रुख्मीनबाई आबासाहेब भोसले, वर्षा भिमराव गोरे, लता शामराव डिगुळकर, ममता राजकुमार अग्रवाल, मिनाक्षी सोपानसा सातपुते, रमाबाई सिध्दार्थ खंदारे, तज्ञ संचालिका मनिषा विजयसा कडतन यांच्या विरुध्द फसवणुक व महाराष्ट्रय ठेवीदारांच्या हित संबंधाचे संरक्षण अधिनिमयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक श्रीमनवार पुढील तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.