Beed News : शाळांमधूनच आर्थिक व्यवहार, रोजगाराचे शिक्षण ; मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

शाळा करणार तंबाखू, प्लॅस्टिक अन् कॉपीमुक्त
Beed
Beedsakal
Updated on

बीड : जिल्ह्यातील शाळा आता तंबाखूमुक्त, प्लॅस्टिक मुक्त आणि शाळांच्या परीक्षाही कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यात ४५ दिवस मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान चालणार आहे. त्यासाठी तालुका निहाय केंद्रप्रमुखांच्या बैठकाही होत आहेत. या अभियानात विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांसह रोजगाराचे शिक्षणही देण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणात भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय सुधारणा अधिक गतिमान करण्याचे कामही या अभियानात हाती घेण्यात आले आहे. जिल्हाभरातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित ३६८१ शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी दिली. या अभियानाच्या यशस्वितेसाठी तालुका निहाय केंद्रप्रमुखांच्या बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत. यानुसार अंबाजोगाईत सोमवारी (ता. आठ) बैठक झाली असून, आता आष्टी (ता. १०), बीड (ता. नऊ) बैठक झाली असून, आणखी ता. १० रोजी बैठक होणार आहे.

तर, धारूर, गेवराई, माजलगाव, केज, परळीच्या बैठका देखील मंगळवारी (ता. नऊ) पार पडल्या. तर, शिरुर कासार व पाटोद्याच्या बैठका (सोमवारी, ता. आठ) पार पडल्या. दरम्यान, बीडच्या कार्यशाळेत गटशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, शालेय पोषण अधीक्षक तुकाराम पवार, सिद्धेश्वर माटे, श्री. वाघ, योगेश पवार, अमजद खान, केंद्रप्रमुख रशीद खान यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थी ही देशाची भावी पिढी आहे. त्यांच्यात आतापासूनच व्यसनमुक्ती, प्लॅस्टिक मुक्तीची भावना निर्माण व्हावी तसेच त्यांना आर्थिक व्यवहार आणि स्वयंरोजगाराचे धडे मिळावेत, यासाठी अभियानातून प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यात अभियान यशस्वी होईल.

— अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

अभियानाचा असा आहे हेतू

Beed
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३२ कोटींचा पीकविमा मिळणार

शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत भौतिक सुविधा निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढ करणे, प्रशासकीय सुधारणा करणे हा हेतू आहे. तसेच, शाळांच्या आसपासची तंबाखूजन्य पदार्थांची विक्री थांबविणे आणि विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनाचे धोके सांगणे, शाळा पूर्णपणे प्लॅस्टिक मुक्त करण्यात येणार आहेत.

अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आनंददायी व पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, विद्यार्थी- पालक, माजी विद्यार्थ्यांत कृतज्ञतेची व उत्तरदायित्व भावना निर्माण करणे, आर्थिक साक्षरतेसाठी कर्ज, खर्चांचे नियोजन, ऑनलाइन व्यवहारही विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत. स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडविण्यासाठी विविध कौशल्यावर, आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठेवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.