Beed : रुग्णवाहिका चालक ६ महिने विनावेतन; आर्थिक अडचणीत आलेल्या चालकांचे कामबंद आंदोलन, रुग्णांची हेळसांड

प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय व अधिनस्थ संस्थांमधील रुग्णवाहिकांसाठी बाह्यस्त्रोताने चालक पुरविणाऱ्या कंपनीने सहा महिन्यांपासून चालकांचे वेतनच अदा केले नाही.
financial crisis ambulance driver 6 months unpaid strike of drivers collector office
financial crisis ambulance driver 6 months unpaid strike of drivers collector officeSakal
Updated on

Beed News : प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय व अधिनस्थ संस्थांमधील रुग्णवाहिकांसाठी बाह्यस्त्रोताने चालक पुरविणाऱ्या कंपनीने सहा महिन्यांपासून चालकांचे वेतनच अदा केले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या चालकांनी सोमवारी (ता. २२) कामबंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. परिणामी याचा सेवेवर परिणाम झाला.

२६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तसेच जिल्हा रुग्णालय व अधिनस्थ रुग्णालयांसाठी ३७ असे ६३ रुग्णवाहिकांच्या चालक पुरविण्याचे कंत्राट एका खासगी संस्थेकडे आहे. संस्थेने प्रत्येक महिन्याला चालकांचे वेतन अदा करावे, तसेच दर तीन महिन्याला आरोग्य विभागाला वेतन अदा केल्याचे देयक सादर करावे, असा करार आहे.

मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांच्या चालकांना सहा महिन्यांपासून संबंधित संस्थेने वेतनच अदा केले नसल्याचा प्रकार घडला. तर, जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्थ संस्थांमधील चालकांना चार महिन्यांपासूनचे वेतन अदा केले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.

यामुळे रुग्णवाहिका चालकांनी याबाबत आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आरेाग्य विभागाने संबंधीत यंत्रणेला नोटीस बजावूनही याची दखल घेतली नाही. त्यामुळे चालकांनी सोमवारी काम बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. काम बंद असल्याचा परिणाम रुग्णवेवेर झाला.

पीएफ फंडही आतापर्यंत भरला नाही

दरम्यान, आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका चालकांचा तब्बल मागच्या ३८ महिन्यांपासूनचे पीएफ या कंत्राटदार कंपनीने भरले नाही. तर, जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्थ चालकांचा फंड अद्यापही दिला नसल्याचा आरोप करण्यात आला.

नोटीसींना कंपनीकडून केराची टोपली

संबंधित कंत्राटदार कंपनीला आरोग्य विभागाने चालकांचे वेतन नियमित अदा करावे, त्यांची हजेरीपत्रके वेळेत सादर करावीत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देऊनही संबंधीत संस्थेने या नोटीसीला केराची टोपली दाखविली आहे.

मागच्या चार वर्षांपासून कंपनीची अशी मनमानी सुरु असल्याने चालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे वेळोवेळी आंदोलनांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांना विचारले असता, आता कंपनीला अंतिम नोटीस देण्यात येईल. याउपर कामात सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.