निलंगेकरांना 'निलंगेकरांची' होतेय पदोपदी आठवण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर
Updated on

निलंगा (जि.लातूर) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर (Former Chief Minister Of Maharashtra Shivajirao Patil Nilangekar) यांचे प्रथम पुण्यस्मरण आज मंगळवारी (ता.२४) आहे. निलंगा (Nilanga) शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय दूरदृष्ठी ठेवून चाळीस वर्षांपूर्वी केली असल्यामुळे टंचाई काळातही शहरवासीयांना कधीच पाणीटंचाई जाणवली नाही. त्यामुळे निलंगेकराना 'निलंगेकराची' आठवण पदोपदी येतेच म्हणावे लागेल. गतवर्षी दीर्घ आजाराने डाॅ. निलंगेकर यांचे (Latur) निधन झाले. त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण असून प्रतिकुल परिस्थितीतही त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्याचा अनुभव मंत्री म्हणून त्यांना घेतला होता. पाटबंधारे खाते असताना महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांची उभारणी त्यांच्या काळात झाली. दुष्काळाच्या दुष्टचक्रात कायम असलेल्या मराठवाडा (Marathwada) व विदर्भातील (Vidarbh) मोठ-मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तेथे सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे डाॅ. निलंगेकर यांच्या काळात अनेक प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती सध्याच्या राजकारण्यांना आल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर
'नारायण राणे कोंबडी चोर' च्या घोषणा देत शिवसेनेचे आंदोलन

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जडण-घडणीत सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधण्यात कुटुंबाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. कोणावर वडिलाच्या विचारांची छाप असते, तर कोणावर आईच्या विचाराचे संस्कार असतात. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे पाच महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. परंतु आईने मोठ्या जिद्दीने त्यांना शिक्षणाचे धडे देत कर्तृत्व नेतृत्व घडविण्यास आईच्या संस्काराची शिदोरी महत्त्वाची राहिली. डाॅ निलंगेकरांचा जन्म झाला तो काळ तसा सामाजिक, राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल व तेवढाच संवेदनशील कालखंड होता. एकाबाजूला ब्रिटिशांचे साम्राज्य, तर दुसऱ्या बाजूला हैदराबादच्या निजामशाहीची दडपणूक अशा प्रतिकूल वातावरणात त्यांचे सकारात्मक पद्धतीने त्यांची जडणघडण आईने केली. नऊ फेब्रुवारी १९३१ रोजी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा सहभाग अधिक होता. स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांना शासनाने गौरवले असले तरी त्यांनी कधीही मानधन स्वीकारले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निलंगा येथे सुरुवातीला वकिली व्यवसाय सुरू केला. त्यातच आर्य समाजाच्या विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. निलंगा येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निजाम राजवट असतानाही त्यांना १९४५-४६ मध्ये पुढील शिक्षणासाठी गुलबर्गाला पाठवण्यात आले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सध्या धोका नाही: राजेश टोपे

गुलबर्ग्याच्या नूतन विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्याकडे संघटनकौशल्य, संयमीपणा, शांतवृत्ती आदी गुणांमुळे ते शिक्षकांमध्ये प्रिय झाले होते. एक जमीनदार शेतकरी म्हणून त्यांच्या वडिलांचा लौकिक होता. त्या काळात दळण-वळणाच्या सुविधा नसल्यामुळे ते घोड्यावर बसून गुलबर्गावरून गावाकडे यायचे. त्यांनी पदवी पूर्ण करून एलएलबी शिक्षणही पूर्ण करून वकिली व्यवसाय सुरुवात केली. १९४८ मध्ये मुंबई परिसरात मराठी भाषकांचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. या मागणीने जोर धरला होता. १७ ऑक्टोबर १९४८ रोजी दादरला महाराष्ट्राचे अधिवेशन होते. या अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. काँग्रेस पक्षाचे विद्यार्थिदशेपासून निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आजही महाराष्ट्राला परिचित आहे. शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपतराव सोळुंके यांच्याविरुद्ध १९५२ या वर्षी पहिले निवडणूक लढविली. मात्र त्यांचा यावेळी पराभव झाला. १९६२ नंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निलंगा विधानसभा मतदारसंघावर सतत आपली पकड मजबूत ठेवली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर
बाळ सुखरूप मिळताच आईने हंबरडा फोडत घेतले कुशीत

शिवाय देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे त्यांच्या अतिशय निकटचे संबंध होते. काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवात ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यावेळी काँग्रेस पक्षाची शताब्दी असताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी इंदिरा गांधी यांना महाराष्ट्रीयन 'इरकल' साडी परिधान करायला लावली होती. गांधी घराण्याची निकटचे संबंध असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळात ती सुरुवातीला उपमंत्री म्हणून राहिले. त्यानंतर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाल उजाळा देणारा राहिला आहे.मुख्यमंत्री असताना मराठवाडा, विदर्भ असा विकास कलमी कार्यक्रम राबवला होता. मराठवाड्यातील दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरुवातीला सुरू करीत असताना त्यांनी तात्पुरती ब्रँच मंजूर करून घेतली. औरंगाबाद येथे जवळपास चाळीस एकरमध्ये विमानतळाची उभारणी त्यांच्या काळात झाली होती.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर
नारायण राणे चिपळूणमध्ये, मोठा पोलीस फौजफाटा तैनात

मराठवाड्यासाठी खंडपीठ मंजूर करून घेतल्यानंतर आजही तेथे ४० ते ५० हजार वकील काम करित आहेत. शिवाय जिल्हास्तरावरील जिल्हा न्यायालय, तालुकास्तरावरील न्यायालय, सिंचनाच्या सुविधा असे अनेक विकासकामे त्यांनी पूर्ण केले आहेत. शिवाय लातूर व जालना जिल्ह्याची निर्मितीही तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना निलंगेकरानी करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पाटबंधारे मंत्री असताना त्यानी भीमा नदीवरील उजनी येथे मोठा प्रकल्प केला. पुणे जिल्ह्यातील टिंबे प्रकल्प, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे मध्यम प्रकल्प, तेरणा नदीवरील निम्न तेरणा प्रकल्प, विदर्भातील नदीवर अपर वर्धा धरण, लातूर-बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा नदीवर धनेगाव येथे धरण, तेरणा व मांजरा नदीवर अनेक ठिकाणी बॅरेजेस अशा अनेक सिंचनाच्या योजना त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना राबले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर
'राणे साहेब जे काय बोलले ते ठाकरी भाषेत बोलले'

निम्न तेरणा प्रकल्प करीत असताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना झगडावे लागले. न्यायालयांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ आली. मात्र त्यांनी धरणाचे काम पूर्ण केले. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प राबविल्यामुळे त्या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघ अनेक लहान-मोठे प्रकल्प त्यांनी उभे करून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला आहे. मसलगा मध्यम प्रकल्प, बडूर मध्यम प्रकल्प यासह विविध लघु प्रकल्प, मांजरा नदीवरील अनेक बॅरेजेस हे त्यांच्या दूरदृष्टी व नेतृत्वाची साक्ष म्हणावे लागेल. निलंगा शहरासाठी भविष्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून माकणी (ता.लोहारा) प्रकल्पातून ५५ किलोमीटर पाईपलाईन चाळीस वर्षापूर्वी केली असून ही योजना नगरपालिकेला परवडणारी नव्हती. तरीही त्यांनी दूरदृष्टी ठेवून ही प्रचंड खर्चिक योजना आणली. कितीही दुष्काळ, पाणीटंचाई असली तरी निलंग्याला त्याचा कधीही फटका बसत नाही ही बाब त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाची साक्ष देते म्हणून डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकराची आठवण निलंगेकराना पदोपदी आल्याशिवाय राहवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.