हिंगोली : विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. या नदीवर तीन बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठविल्या गेल्याने चारशे ते पाचशे एकर शेती सिंचनाखाली आली आहे. खरीप, रब्बीच्या पिकांबरोबर उन्हाळी पिके शेतकरी घेत असून या पाण्याचा पिण्यासाठीही उपयोग होत आहे.
विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरून सवना गावाजवळून पैनगंगा नदी वाहते. या नदीवर सन २०११ पासून बॅरेजेस उभारण्याचे काम सुरू आहे. काही भागात या बॅरेजेसचे काम झाले आहे. यात मराठवाड्यातील सवना, वायचाळ पिंपरी, सुरजखेडा, पिंपरी या गावांचा समावेश आहे. विदर्भातील गणेशपूर, आडगाव, बोरखेडी, भगवती, जुमडा, कोकनगाव या गावांजवळ तीन, तर पुढे सात, असे दहा बॅरेजेस या नदीवर आहेत.
हेही वाचा - ट्रेलरचे दोन तुकडे; चालकाचा मृत्यू
उन्हाळी पिके व फळबागांची जोपासना
यामुळे पाणी साठवणुकीस मदत झाली आहे. या साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला लाभ होत आहे. नदीकाठांवर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणी पातळीत कायम वाढ राहते. त्या पाण्याचा फायदा शेतकरी पिकांसाठी करतात. यात खरीप, रब्बीतील पिकांबरोबर उन्हाळी पिके व फळबागांची जोपासना केली जाते. तसेच साठलेल्या पाण्यावर पाचशेच्या वर विद्युत मोटारी सुरू असतात. अनेक शेतकऱ्यांनी जलवाहिन्या टाकून पाणी शेतपर्यंत नेले आहे.
यावर क्लिक करा - अकराशे एकरांची नोंद असणारी सातबारा पुस्तिका गायब
मुबलक पाणी साठण्यास मदत
यामुळे उत्पादनात वाढ झाली असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागण्यास मदत झाली आहे. या भागात असलेल्या वन्य प्राण्यांनादेखील पाण्याचा लाभ होत आहे. बॅरेजसमध्ये असलेले पाणी पूर्ण उन्हाळाभर राहात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, विदर्भ- मराठवाड्यातील नदीकाठांवर असलेल्या तसेच बॅरेजेसच्या परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीतही पाण्याचा मोठा लाभ झाला आहे. बॅरेजसचे खोलीकरण केल्यास मुबलक पाणी साठण्यास मदत होणार आहे.
जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न निकाली
या बॅरजेसमुळे आमची सर्व शेती पाण्याखाली आली आहे. यामुळे खरीप, रब्बीच्या पिकांबरोबर उन्हाळी पिके घेतो. पावसाळ्यात मात्र नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसानही होते. पण त्याचा रब्बी व उन्हाळी पिकांना लाभ होतो. तसेच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न निकाली लागत आहे.
-गणपत नायक, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.