परळी वैजनाथ : परळी - बीड राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून या रस्त्यावर सेलू फाट्यावरील व वडखेल जवळील खंडोबा माळाच्या बाजुचा पर्यायी पुल जोरदार पावसामुळे आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याने व दोन-तीन दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेला पांगरी येथील पूलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडली आहे. यामुळे नागरीकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.