हिंगोलीत स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण

hingoli karmachari
hingoli karmachari
Updated on

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हिंगोली येथे शनिवारी (ता.११) फुलांची उधळण करीत स्वागत केले. अचानक झालेल्या स्वागताने कर्मचारी भारावून गेले होते.

संपूर्ण जगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा बजावणारे जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र राबताहेत. यामध्ये सफाई कामगार, डॉक्टर, पोलिस प्रशासन, वीज कर्मचारी, दूध विक्रेते, पत्रकार, नर्स, आदींचा समावेश आहे. नगरपालिकेचे सफाई कामगार शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

पुष्पहार देवून स्‍वागत

त्यांना कामासाठी ऊर्जा मिळावी यासाठी हिंगोलीकरानी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी फुलांची उधळण करीत टाळ्या वाजवून सन्मान करण्यात आला. सोशल डिस्‍टन्स ठेवत कर्मचाऱ्यांचा पुष्पहार देवून स्‍वागत करण्यात आले. अचानक झालेल्या या सन्मानाने अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी भारावून गेले. या पुष्पवृष्टीमुळे नक्कीच काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

हिंगोलीतील रस्ते बनले चकाचक

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्ते शनिवारी (ता.११) टँकरच्या साह्याने पाणी टाकून धुऊन काढण्यात आले. तसेच विविध प्रभागात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. हिंगोली येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कोरोनावार्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

रुग्णांची संख्या वाढत चालली

तसेच कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र तरीही नागरिक प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत विनाकारण फिरताना दिसून येत आहेत. 

मुख्य रस्त्यावर पाणी मारले

त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य रस्ते पाण्याने धुऊन काढण्यात आले आहेत. इंदिरा चौक ते रिसाला बाजार या मुख्य रस्त्यावर पाणी मारले जात आहे. 

सर्व रस्ते चकाचक 

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, देवडा बँक, बसस्थानक परिसर, रिसाला बाजार आदी परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे सर्व रस्ते चकाचक दिसत आहेत. शुक्रवारी शहरात पाच ठिकाणी भरलेल्या भाजी बाजार परिसर देखील पाण्याने धुण्यात आला आहे.


नर्सिंग स्‍कूलच्या विद्यार्थिनीही कोरोनाच्या लढाईत सहभागी

वसमत : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनासह शासनही विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. जिल्‍हा प्रशासनाचे सर्वच कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. त्‍यांना मदत करण्यासाठी वसमत येथील इंदिरा गांधी नर्सिंग स्‍कूलच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे.

गरजूंना मदत करण्याचे आवाहन

वसमत येथील उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार ज्योती पवार यांनी सामाजिक संस्था, समाजसेवक यांना गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते. यात खारीचा वाटा उचलण्याच्या हेतूने वसमत येथील इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलच्या (ए.एन.एम.) विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे. 

विद्यार्थिनींचा समावेश

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व नर्सिंग स्कूलचे संचालक प्रा. रमेश मानवते यांच्या पुढाकाराने वर्षा कोंगे, सपना गायकवाड, कोयल खंदारे, काजल सोनटक्के, अश्विनी चवणे, देवदया भालेराव, सपना थोरात, अश्विनी गजभार (काळे), शिल्पा गायकवाड, पूजा गायकवाड, दीक्षा धायजे, आरती कांबळे, रेणुका खैरे (जाधव) आदींनी सहभाग नोंदविला आहे.तसेच धम्मपाल काळे, मोकिंद पिसाळ सहकार्य करीत आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.