Edible oil price : खाद्यतेल दरवाढीने कोलमडले नियोजन...ऐन दसरा, दिवाळी सणांच्या तोंडावर महागाईचा भडका

Edible oil price : दसरा आणि दिवाळीच्या सणांच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. सोयाबीन तेलाच्या भावांमध्ये झालेल्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
Edible Oil Price Hike
Edible Oil Price Hikeesakal
Updated on

करमाड : ऐन दसरा, दिवाळी सणांच्या तोंडावर केंद्र सरकारने तेलावरील आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सर्वाधिक वापरले जाणारे सोयाबीन तेलाचे भाव लीटरमागे २५ ते २८ रुपयांनी वाढल्याने लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले आहे.

शासनाने महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची गरज आहे, असे जाणकारांचे मत आहे. दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाडीचा भडका उडतो, हे काही नवीन नाही, मात्र, लिटरमागे तब्बल २५ ते२८ रुपयांच्या तर किलोमागे ३२ रुपये दरवाढीने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचा महिन्याच्या बजेटवरदेखील परिणाम झाला आहे.त्यामुळे लाडक्या बहिणीचे स्वयंपाकघरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे.

खाद्यतेलाचे बाजारात असे आहेत भाव

बाजारात सध्या लीटरप्रमाणे सोयाबीनचे तेल १३२ रुपये, शेंगदाणा १६०, सूर्यफूल १४०, पामतेल १२५ रुपये असे भाव आहेत. यात सोयाबीनच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे, अशी माहिती किराणा व्यापारी बाळूशेट चोपडा यांनी दिली.

सोयाबीनचे दरही वाढेनात

खाद्यतेलाचे दर एकीकडे वाढत असले तरी दुसरीकडे सोयाबीनच्या दरात मात्र वाढ होत नसल्याचे चित्र आहे. खाद्यतेलाचे भाव वाढले की, सोयाबीनचे दर वाढतात असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावेळी मात्र हा अंदाज खोटा ठरत असल्याने शेतकरी चिंतित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.