- विष्णू नाझरकर
जालना : ''मरावे परी कीर्तिरूपी उरावे'' या उक्तीप्रमाणे मृत्यूपश्चात मानवी देहाचा उपयोग व्हावा. आपल्या देहाचा अभ्यास करून चांगले डॉक्टर घडावे. या उदात्त हेतूने आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी शहरातील आनंदनगर येथील सदानंद टवळे यांनी आईचे मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान घडवून आणले.