परदेशी अभ्यासकांनाही संत जनाबाईंची भुरळ

गंगाखेडच्या संत जनाबाई मंदिरात डाॅ. इरिना ग्लुश्कोव्हा यांचा सत्कार करण्यात आला.
गंगाखेडच्या संत जनाबाई मंदिरात डाॅ. इरिना ग्लुश्कोव्हा यांचा सत्कार करण्यात आला.
Updated on

नांदेड - महाराष्ट्रातील संत साहित्य, वारकरी संप्रदायाला जगभरात विशेष महत्व आहे. मराठवाडा देखील संताची भूमी असून या ठिकाणी अनेक संत होऊन गेले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा अभ्यास करणारी मंडळी महाराष्ट्रासह भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. त्यापैकी एक असलेल्या डाॅ. इरिना ग्लुश्कोव्हा. मराठी भाषा व संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे.  

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असलेल्या गंगाखेड शहराला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गंगाखेड ही संत जनाबाई यांची जन्मभूमी असून या ठिकाणी मंदिरही आहे. त्यामुळे संत जनाबाई यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्यासाठी मराठी भाषा व संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. इरिना ग्लुश्कोव्हा या गंगाखेडला आल्या होत्या. त्यांनी दोन दिवस गंगाखेडला राहून संत जनाबाई यांच्या जीवनकार्याची माहिती घेतली.  तसेच गोरठे (ता. उमरी, जि. नांदेड) येथील संत दासगणू समाधीस्थळीही त्यांनी भेट दिली.

कोण आहेत डाॅ. ग्लुश्कोव्हा...
डाॅ. ग्लुश्कोव्हा या रशियन असून माॅस्को येथील इन्स्टिट्यूट आॅफ ओरिएंटल स्टडीजमध्ये चिफ रीसर्च स्काॅलर म्हणून कार्यरत आहेत. संत ज्ञानेश्वर व तत्कालीन वारकरी साहित्य हा त्यांच्या विशेष अध्ययनाचा विषय असून मराठी भाषाशास्र, लोकसाहित्य व महाराष्ट्राचा इतिहास हे देखील त्यांच्या आवडीचे विषय आहेत.  

नांदेडला व्याख्यान
नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  त्या म्हणाल्या की, संत जनाबाई या संत साहित्यातील सर्वात महान कवयित्री. मात्र त्यांचा १९ व्या शतकापर्यंत गंगाखेड हेच त्यांचे जन्मस्थान असल्याचा फारसा कुठे उल्लेख आढळत नाही. असे असले तरी गंगाखेड हेच संत जनाबाईचे जन्मस्थान असल्याची जनमानसात रुजविण्याचे श्रेय संत दासगणू महाराज यांना जाते. ‘‘मी तत्वज्ञानी नसले तरी संत जनाबाईंविषयी प्राप्त माहितीच्या आधारावर हे गृहितके मांडत असून, संशोधनाअंती मी मांडलेल्या गृहितकांत बदल होऊ शकतो.’’

डाॅ. ग्लुश्कोव्हा यांचे आव्हानात्मक कार्य

एखाद्या परक्या देशातील भाषा नव्याने शिकून तिच्यावर प्रभुत्व मिळवणे व त्या भाषेतील मध्ययुगीन साहित्याचा, त्या भाषिक संस्कृतीचा चिकित्सक अभ्यास करणे हे खरोखरच आव्हानात्मक कार्य असते. अभ्यासू वृत्तीबरोबरच जिद्द, चिकाटी व साक्षेपी वृत्तीची त्यासाठी आवश्यकता असते. मध्ययुगीन मराठी भाषा व संस्कृती यांचा  डाॅ. इरिना ग्लुश्कोव्हा बारकाईने अभ्यास करत आहेत.  ‘संत ज्ञानेश्वर व वारकरी संप्रदाय’ हा त्यांचा विशेष अभ्यासविषय. त्याबरोबरच मराठी भाषाविज्ञान, महाराष्ट्राचा इतिहास व मराठी लोकसाहित्य हेही त्यांचे अभ्यासविषय आहेत.  
- प्रा. डॉ. श्रीनिवास पांडे, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.