आडुळ - पारुंडी तांडा (ता. पैठण) शिवारात मंगळवारी (ता. ६) रोजी एक मोठा अजगर जातीचा साप आढळून आला असुन या अजगराला बघण्यासाठी पारुंडी तांडा सह परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती.
याची माहिती मिळताच स्थानिक वन विभागाच्या वनरक्षक अमीना शेख यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली असता हा खुप मोठा असल्याचे त्यांच्या अजगर निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी तत्काळ छञपती संभाजीनगर येथून वनविभागाची रेस्क्यू टीमला पाचारण केले. या टिपचे आशिष जोशी व मनोज गायकवाड यांनी या अजगराला मोठ्या शिताफीने पकडले.
हा अजगर सात फूट लांबीचा असून या अजगराला पकल्यानंतर वन विभागाचे प्रादेशिक परिमंडळ अधिकारी दादा तौर, वनपाल मनोज कांबळे, बाळु इंगळे, अशोक साबळे, प्रकाश सूर्यवंशी, वनरक्षक अमीना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त केला.
हा अजगर बघण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यावेळेस अजगर पकडल्यानंतर तिथल्या सर्व गावकऱ्यांना सापाबद्दलचे गैरसमज व समज याची माहिती अशीष जोशी यांनी दिली. व सर्पदंश झाल्यास प्रथम उपचार कसे करावे काय काळजी घ्यावी कसे हॉस्पिटल पर्यंत पोहोचावे याची त्यांनी सर्व माहिती दिली अशी माहिती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.