मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप; आजी-माजी आमदार हॉटेलवरच भिडले | Jalna Crime

Jalna Crime
Jalna CrimeSakal
Updated on

अंबड : बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार नारायण कुचे हे एका हॉटेलात थांबलेले असताना शुक्रवारी (ता.२८) तेथे माजी आमदार संतोष सांबरे पोलिसांसह धडकले. आमदार कुचे हे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे दोघांमध्ये खडाजंगी झाली.

अंबडच्या बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच आमदार कुचे शहरातील एका हॉटेलवर शुक्रवारी थांबले होते. तेव्हा माजी आमदार सांबरे यांनी पोलिसांसह या हॉटेलमध्ये प्रवेश केला. तसेच आमदार कुचे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत हॉटेलचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याची मागणी केली.

Jalna Crime
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

त्यातच आमदार कुचे व संतोष सांबरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, याबाबत पोलिस अधीक्षक व जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार केल्याचे श्री.सांबरे यांनी सांगितले. आमदार कुचे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अंबडच्या बाजार समिती निवडणुकीत आमदार कुचे मतदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याचे कार्यकर्त्यांकडून समजले. त्यामुळे हॉटेलवर आम्ही पोलिसांसोबत गेलो होतो. काही कार्यकर्ते पैशाच्या बॅगा नेताना दिसतात. हा आचारसंहितेचा भंग आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केलेली आहे.

— संतोषराव सांबरे, माजी आमदार, बदनापूर

Jalna Crime
Viral Video : बॉसचा फोन आला अन् पठ्ठ्याने थिएटरमध्येच लॅपटॉप उघडून सुरू केलं काम

येथील हॉटेलमध्ये रूम बुकिंग केलेली आहे. मतदारसंघात प्रचार करून हॉटेलमध्ये आराम करत होतो. तेव्हा माजी आमदार संतोष सांबरे आले, ते पैसे वाटपाबाबत खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आरोपात तथ्य नाही. आमच्याजवळ कपड्याच्या बॅगा आहेत. पोलिस तपासात सर्व बाबी स्पष्ट होतील. बाजार समितीवर आम्ही विजयी होऊ याचा विश्‍वास आहे.

— नारायण कुचे,आमदार, बदनापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.