Hillary Clinton : अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपति हिलेरी क्लिंटन यांनी दिली वेरूळ लेणीस भेट

अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी जगप्रसिद्ध वेरूळ लेणीस दिली भेट.
Hillary Clinton
Hillary Clintonsakal
Updated on
Summary

अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी जगप्रसिद्ध वेरूळ लेणीस दिली भेट.

वेरूळ - अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन या गुरुवारी दिनांक 8/2/2023रोजी सकाळी देणार 9 ते 12 दरम्यान जगप्रसिद्ध वेरूळ लेणीस भेट दिली असून वेरूळ लेणी पाहून त्या खूप भारावल्या होत्या. गाईड अलीम कादीर यांनी लेनीची माहिती हिलरी क्लिंटन यांना दिली.

श्रीमती क्लिंटन यांनी लेणी क्र १६, लेणी क्र.१०, आणि लेणी क्र ३४ ला भेट दिली. तसेच श्रीमती क्लिंटन या वेरूळ परिसरातील जवळच असलेल्या शहजतपूर शिवारात ध्यान केंद्र मुक्कामी असून तेथे गेल्या सात दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त व सिक्रेट सर्विस एजन्सी चे बंदोबस्त तैनात करण्यात आले असल्याची दिसून आले.

याबाबत पुढे बोलताना ध्यान केंद्राचे शहज शर्मा यांनी बोलताना सांगितले की, ते व अपर्णा पडणीकर दोघांनी मिळून यापूर्वीही श्रीमती क्लिंटन यांना 2018 मध्ये राजस्थान मधील विविध पर्यटन स्थळांचे दर्शन घडविले होते व सध्या येथील फार्म हाऊस मध्ये आम्ही सेंद्रिय शेती करत असून वेरूळ लेणी हे जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असल्याने येथे उच्च दर्जाची सुविधा देणारे फार्म हाऊस उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. तसेच या दौऱ्या निमित्ताने श्रीमती क्लिंटन या गुजरात अहमदाबाद येथील सेवा संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेऊन बुधवारी दिनांक 7/2/2023रोजी संध्याकाळी येथे आल्या आहे. वेरूळ परिसरातील शहजतपूर शिवारात दोन रात्री मुक्कामी असून त्या व वेरूळ लेणी बघून त्या वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे जाणार आहे.

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

पोलीस बंदोबस्त श्रीमती क्लिंटन यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या दूतावासातील सुरक्षारक्षक, पोलीस उपाधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे व पोलीस प्रशासनाच्या वतीने चूक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून एक अग्निशमन बंब, व आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्स ही तैनात करण्यात आली होती.

यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधातेझ तहसीलदार सुरेंद्र देशमुख, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संवर्धन सहाय्यक राजेश वाकलेकर, सुरक्षा रक्षक एजन्सी चे प्रदीप साहू तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.