नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी संचारबंदी लावूनही शहरात दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना आवर घालने शक्य होत नव्हते. यामुळे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड शहरात महत्वाच्या चाळीस ठिकाणी लाकडी अडथळा (बॅरिकेट्स) लावण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
वाहनधारकांचे सुचनांकडे दुर्लक्ष
जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना राबवित आहेत. याचाच एक भाग असलेल्या एकवीस दिवसाचा लॉकडाऊन शासनाने जाहीर करुन नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. याच अनुषगांने नांदेड शहरात पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशा सुचना करुनही त्याकडे दुर्लक्ष करत विनाकारण अनेक वाहनधारक रस्त्यावर धावताना दिसत आहेत. या उनाडटपूंना काठ्यांचा प्रसादही बसला. तसेच काही लोकांविरुध प्रतिबंधात्मक कारवाइ करावी लागली.
हेही वाचा....शेतकऱ्यांचा ‘मेसेज’ आणि मुख्यमंत्र्यांची तत्परता...!
शहरातील चाळीस फिक्स पाँइट
शहरातील वाहनधाकरकांना काही फरक पडला नसल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी शहरातील महत्वाच्या चाळीस ठिकाणी लाकडी बॅरिकेट्स लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी (ता. २७) करण्यात आली. या अडथळ्यातून अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा करणारी वाहणे, भाजीपाला, दुध, औषधी पुरवठा करणारी वाहणे, शासकीय कामानिमित्त कामवर जाणारे कर्मचारी तसेच रुग्णवाहिकांना अशा वाहनांचा सोडण्यात येणार आहे.
हेही वाचलेच पाहिजे....‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात खडा पहारा
एसपी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना
नांदेड जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यभर कलम १४४ फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सदर संचारबंदी व लॉकडाऊनच्या अनुषंगाने लोकांना तत्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात सुसज्ज नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
चोविस तास सेवा उपलब्ध
येथील दूरध्वनी क्र. ०२४६२ - २३४७२० व हेल्पलाइन क्रमांक १०९१ व १०० क्रमांकाच्या पाच लाईन सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचे पोलिसांसोबत सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या, तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा व्हावी. याकरिता नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे व्हाट्सअप मेसेज सेवा सुरू करण्यात आलेली आहे. ही सेवा चोविस तास उपलब्ध असते त्याचा क्रमांक ८८८८८ ८९२५५ हा आहे. त्यावर देखील नागरिकांना या क्रमांकावर माहिती देणे बाबत सांगण्यात यावे. या क्रमांकाची प्रसिद्धी वर्तमान पत्रांमधून देण्यात यावी. जेणे करून नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकास त्याचा लाभ घेता येइल, असे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगीतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.