आजीसह चार बालके ‘साईआश्रया’त

file photo
file photo
Updated on

सेलू : कुपटा (ता.सेलू, जि.परभणी) येथील शेतमजुर दांपत्याने १२ फेब्रवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील आजीसह त्यांची चार बालके उघड्यावर पडली. या आजीसह या बालकांना आता शिर्डी (जि.अहमदनगर) संस्थानच्या ‘साई आश्रया’ने आधार दिला आहे.

कुपटा (ता.सेलू) येथील शेतमजुर दांपत्य तुकाराम हारके (वय ३०) व सविता हारके (वय २३) यांनी वाकी शिवारातील शेतातील आखाड्यावर विहिरीत आत्महत्या केल्याची घटना ता.१२ फेब्रुवारी रोजी घडली होती.
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दांम्पत्याकडे केवळ ३० गुंठे जमीन व पत्राची छोटीशी खोली इतकीच स्थावर मालमत्ता होती. मात्र, आत्महत्या केलेल्या दांपत्यांना छोटी छोटी चार आपत्य आहेत. सदरिल चार आपत्यांची उपजिवीका कोण आणि कशी करणार? हाच प्रश्न कुटुंबातील आजी कौशाबाई मानिकराव हारके यांच्या समोर होता. दरम्यान, हारके यांचा नातेवाइक गोविंद पडुळे यांनी शिर्डी संस्थाला याबाबत माहिती दिली होती.

आधारासाठी कोणतरी उभे रहावे
 या माहितीवरुन साक्षात ईश्वरी रुपाने कोणीतरी आधार देणारा व्यक्ती उभा रहावा. अगदी त्याच प्रमाणे शिर्डी (जि. अहमदनगर) येथील पत्रकार किशोर पाटणी व सबका मालिक एक प्रतिष्ठानचे विश्वस्त गणेश दळवी हे चारचाकी वाहनासह सोमवारी (ता.दोन) कुपटा (ता.सेलू) येथील आत्महत्या केलेल्या शेतमजुर कुटुंबियाकडे दाखल झाले. या वेळी त्यांनी वैष्णवी (वय ९), ईश्वरी (वय ६), गायत्री (वय ३), भागवत (वय ९ महिने) व या चार चिमुकल्यांची आजी कौशाबाई हारके (वय ८०) या पाच जणांना शिर्डी येथील साईआश्रयात घेऊन गेले.
या वेळी कुपटा येथील पोलिस पाटील मानिकराव सोंळके, डाॅ. विष्णु दराडे, पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर आदीं उपस्थित होते.

११० निराधारांना आधार...
शिर्डी येथील ‘साईआश्रया’ या संस्थेत आजपर्यंत महाराष्ट्र व त्या लगतच्या राज्यातील ११० निराधार मुलांना आधार देण्यात आला आहे. वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलेनेदेखील आपले एचआयव्ही बाधीत छोटे मुल या संस्थेत आणुन सोडले आहे. एचआयव्ही बाधीत असणारे हे मुल गौरव नावाने आजही या संस्थेत स्वत:च्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत आहे. तसेच सात महिन्यांची छोटी चिमुकली जिच्यावर सात शस्रक्रिया करण्यात येवुन तिचे श्रद्धा नामकरण करण्यात आले. अशा निराधार चिमुकलीच्या चेहऱ्यावरदेखील या संस्थेने हास्य फुलवीले. इतकेच नव्हे तर या संस्थेने आश्रमातील तीन मुलींचे लग्नदेखील आपआपल्या धर्मा प्रमाणे साई पालकी निवारा आश्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने विवाह संपन्न झाले.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.