Latest Marathi News: शहरातील लॉजवर ३० ऑगस्टला अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच गंगाखेड पोलिस ठाण्यात एकाच रात्री शुक्रवारी (ता. सहा) अत्याचाराचे चार गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिली घटना : गंगाखेड तालुक्यातील जि.प. शाळेतील संशयित शिक्षक बालाजी भंडारे याने तेरावर्षीय मुलीचा वर्गातच विनयभंग केला. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील तिघांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले असून, बालाजी भंडारे फरार आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गंगलवाड करीत आहेत.