नांदेड : देशासह जगावर आपत्ती ओढवलेल्या कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी विविध स्तरावरुन प्रयत्न होत आहेत. यासाठी वैद्यकीय उपकरणं तसेच इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी अनेकजन सरसावले आहेत. जिल्ह्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्यासह लोकसभा सदस्यांनी आजपर्यंत तीन कोटी ८५ लाखांचा निधी राज्य तसेच केंद्र शासनाला दिला आहे.
मुख्यमंत्री, पंतप्रधान सहायता निधीत ४१ कोटी
कोरोनाच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील दात्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ४० लाख ८१ हजार १९४ रुपयाची मदत केली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान केअर निधीसाठी ५३ हजार ५५१ रुपये मदत दिली आहे. आजपर्यंत एकूण ४१ लाख ३४ हजार रुपयांचे योगदान नांदेडच्या नागरीकांनी दिले आहे. या निधीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नागरिकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा....नांदेडकरांचे सहाय्यता निधीत ४१ लाखांचे योगदान
पालकमंत्र्यांचे आवाहन
कोविड १९ विषाणू प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात आमदार निधीतून दिला जाणारा निधी खर्च करतांना ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी एक व्हेंटीलेटरची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याबाबत मतदारसंघातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन आरोग्याच्यादृष्टिने अनुषंगीक बाबींवर लागणारी प्राधान्यक्रमाने सामुग्रीची माहिती घेवून त्यानुसार प्राधान्यानेच आवश्यक बाबी खरेदी करणे योग्य राहील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बैठकीत नमूद केले होते.
हेही वाचलेच पाहिजे.... कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद
आमदार, खासदारही आले पूढे
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील आमदार निधी व खासदार निधीतुन जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार व खासदार पुढे आले आहेत. राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पन्नास लाख. आमदार राजेश पवार पन्नास लाख, आमदार अमरनाथ राजूरकर पन्नास लाख, आमदार राम पाटील रातोळीकर चाळीस लाख, आमदार भिमराव केराम चाळीस लाख, आमदार बालाजी कल्याणकर तीस लाख, आमदार डॉ. तुषार राठोड २५ लाख, आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दोन ॲब्युलंससाठी निधी देण्याचे मान्य केले आहे.
खासदार चिखलीकर यांनी दिले एक कोटी
जिल्ह्यातील आमदारांसोबतच खासदारांनीही विकास निधी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दिला आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्र सरकारकडे एक कोटींचा निधी दिला आहे. यासोबतच राज्यसभेच्या दोन खासदारांकडूनही प्रत्येकी पन्नास लाखांचा निधी प्राप्तीसाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील ऊर्वरीत लोकप्रतिनिधी कडूनही पत्र लवकरच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडून मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.