सेलू ः शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोन व इतर एक असे तीन कोरोना बाधितांचे अहवाल मंगळवारी (ता.सात) प्राप्त झाले. शहरात व तालुक्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे सेलू नगरपरिषद क्षेत्रात बुधवारी (ता.आठ) ते शनिवार (ता.११) पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष दिपक मुगळीकर यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत.
शहरातील हसमुख काॅलनीतील दोन विवाहित महिलांनी कोरोनावर मात केल्याने गुरुवारी (ता.दोन) त्यांना सुट्टी झाली. शहरासह तालुका कोरोनामुक्त झाल्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतू, पुणे येथून तालुक्यातील वाई गावात आलेला एक व शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एक अधिकारी व त्यांच्या सहवासातील दोन कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्यामुळे महसूल, नगर परिषद व आरोग्य विभागासह नागरिक धास्ताऊन गेले.
तीन किलोमीटर परिसरात संचारबंदी
जिल्ह्याच्या नागरी भागात बाहेरून येत असलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यानंतर कोरोना बाधित आढळून येत असल्याने व सेलू शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शहर तसेच नगर परिषदेच्या हद्दीतील तीन किलोमीटर परिसरात बुधवारी (ता.आठ) दुपारी तीन पासून ते शनिवारी (ता.११) चे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा - दोन हजार २०० पोषण परसबागा साकारणार हा जिल्हा..
यांना असेल सुट
शासकीय कार्यालय त्यांचे कर्मचारी, वाहने, सर्व शासकीय वाहने, शासकीय खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, निवारगृहात व शहरातील अन्न वाटप करणारे एन.जी.ओ.व त्यांचे वाहने, परवानाधारक वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोल पंप, गॅस वितरक कर्मचारी व त्यांची वाहने, दुध विक्रते (सकाळी सहा ते नऊ या वेळेत), राष्ट्रीयकृत बँका केवळ रास्त भाव दुकानदार, पेट्रोल पंप चालक, गॅस वितरक व विज कंपनी यांच्याकडून चलनाद्वारे पैसे भरणा करून घेणे व बँकेची ग्रामीण भागात रोकड घेऊन जाणारी वाहने यांना अत्यावश्यक सेवा म्हणून संचारबंदी आदेशानुसार सुट देण्यात आली आहे.
उल्लंघन केल्यास कार्यवाही
संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कार्यवाही केली जाणार असून संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस प्रशासनासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी सेलू यांना देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.