Accident News : देवदर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील तरुणांच्या कारला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान उसाच्या ट्रक्टरला भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला आहे.
latur Accident News
latur Accident Newsesakal
Updated on

चाकूरः लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान उसाच्या ट्रक्टरला भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.३) पहाटे साडेतीन वाजता घडली आहे. नांदेड येथील पाच तरूण एम. एच. २६ बी. सी. ८२८६ क्रमांकाच्या कारमधून लातूरमार्गे तुळजापूरकडे निघाले होते. लातूर- नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रापाटीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा ऊस लातूरच्या कारखान्याकडे घेऊन जात असलेल्या ट्रक्टरला पाठीमागून कारने जोराची धडक दिली.

कारच्या धडकेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

latur Accident News
Rahul Gandhi on Ambani Family : ''इकडे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे...'', अंबानींच्या 'प्री-वेडिंग'वरुन राहुल गांधींचा निशाणा

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम, उपनिरीक्षक राजेश घाडगे, बीट अंमलदार भागवत मामडगे, शिरीषकुमार नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मयताच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) रा. किल्लारोड नांदेड, मोनु बालाजी कोतवाल (वय २७), नरमण राजाराम कात्रे (वय ३३), कृष्णा यादव रा. नांदेड यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई रा. नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.