Maternal Mortality : सात दिवसांत चार मातांचा प्रसूतीनंतर मृत्यू
Jalna Health News : जालना शहरात एका आठवड्यात चार मातांचा प्रसूतीनंतर काही तासांत मृत्यू झाला आहे. यावर चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी समिती गठित केली असून, अहवाल ११ नोव्हेंबरला सादर होण्याची शक्यता आहे.
जालना : प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. परंतु, शहरात सात दिवसांमध्ये चार मातांचा प्रसूतीनंतर काही तासांमध्येच मृत्यू झाला.