मानवत (जि.परभणी) : विनयभंगाची खोटी केस दाखल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन शहरातील एका डॉक्टरकडून एक लाख रुपये खंडणी मागणाऱ्या एका महिलेसह चार आरोपींना सोमवारी (ता. २४ ) नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपींविरोधात मानवत पोलिसात सोमवारी (ता. २४) मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉ. भागवत नामदेव हरिमकर यांचा शहरातील सावता माळी चौक येथे दवाखाना आहे. सोमवारी (ता. २४) दररोजच्या प्रमाणे रुग्णांची तपासणी करीत असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अर्चना पंडित (रा. धाररोड, परभणी ) ही महिला विशाल गायकवाड (रा. काद्राबाद प्लाट, परभणी ) याचासोबत दवाखान्यात आली व पोट दुखत असल्याचे सांगितले. डॉ. हरिमकर हे सदर महिलेवर उपचार करीत असताना सोबत आलेल्या विशाल गायकवाड हा मोबाईलद्वारे व्हिडिओ शुटिंग करीत असल्याचे त्यांना आढळून आले. या बाबत सदर व्यक्तीला विचारणा केली असता मोबाईल दाखविण्यास नकार देऊन दवाखान्यातून घाईने बाहेर पडू लागला.
हेही वाचा व पहा - Video: परभणीत १४ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा
डॉक्टरला दिल्या धमक्या
डॉ. हरिमकर यांनी शेजारील मेडिकल दुकानमालक माणिक रोडे यांना बोलावून घेतले. आरोपीकडे जाब विचारला असता आम्हाला नागेश कलंके व दीपक देशमुख यांनी पाठवून शुटिंग करायला सांगितले असल्याचे सांगितले. या वेळी नागेश कलंके व दीपक देशमुख (दोघे रा. पेडगाव, ता. परभणी) त्या ठिकाणी आले व डॉ. हरिमकर यांना तुम्ही बोगस डॉक्टर असून एक लाख रुपये द्या. तुम्ही महिला रुग्णांचा विनयभंग केला आहे. तुझ्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करतो, तुझा मुदडा पाडतो, अशा धमक्या दिल्या.
चार आरोपींविरोधात गुन्हा
या वेळी आवाज ऐकून शेजारील दत्ता रोडे, जनार्दन कीर्तने व अन्य चार - पाचजण आले व त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन गेले. वरील चार आरोपींविरोधात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सोमवारी दिवसभर शहरातील सर्वच डॉक्टर पोलिस स्टेशनला ठाण मांडून बसले होते. या खंडणीचा प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा ....
कान्हेगावच्या तरुणाचा खून
पूर्णा (जि.परभणी) : कान्हेगाव (ता. पूर्णा) येथील लक्ष्मण माणिक नवघरे (वय २३) यांना धारधार शस्त्राने जखमी करून जीवे मारल्याची घटना सोमवारी (ता. २४) घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अनंता दत्तराव नवघरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिकराव राजाराम नवघरे (रा. कान्हेगाव) यांनी पूर्णा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा लक्ष्मण माणिक नवघरे याला सोमवारी आरोपी अनंता दत्तराव नवघरे (रा. कान्हेगाव) यांनी गोड बोलून व काहीतरी कारण सांगून मोटारसायकलवर बसवून कान्हेगाव येथून पूर्णा शहरात आणले. शिताफिने मध्यरात्री कानडखेड शिवारातील रस्त्याजवळील शेतात नेले. शेतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी अनंता नवघरे यांनी लक्ष्मण नवघरे यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.
हेही वाचा व पहा - Video: शेतकरी, नागरी समस्यांविरोधात भाजपचे जिल्हाभरात धरणे
आरोपी स्वत: पोलिसांच्या स्वाधीन
डोक्यावर, छातीवर, पोटावर, कानावर, खोलवर जखमा केरून लक्ष्मण नवघरे यांना जीवे मारले. पूर्णा पोलिस ठाण्यात जीवे मारल्याचा गुन्हा मंगळवारी (ता. २५) दाखल करण्यात आला आहे. मृत लक्ष्मण नवघरे यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगा असा परिवार आहे. आरोपी अनंता नवघरे हे स्वतः पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.