‘ते’ चौदाजन विशेष निगरानीखाली

Collector Dr.Vipin_.JPG
Collector Dr.Vipin_.JPG
Updated on

नांदेड : दिल्लीतील धार्मीक कार्यक्रमाला केलेल्या जिल्ह्यातील चौदा जनांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अतिबात घाबरुन जावु नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. तसेच अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांचे वाहन जप्त करुन त्यांच्या विरुद्ध पोलिसांच्या माध्यमातुन प्रशासन कडक कारवाइ करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत दिली माहिती
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनमध्ये दुपारी चार वाजता आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, विद्यापीठाचे माध्यमशास्त्र संचालक दीपक शिंदे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

चौदाजनांना विशेष देखरेखेखाली
डॉ. विपीन म्हणाले, कि, दिल्लीतील निझामुद्दीन तबलिकी जमात मरकजमध्ये जिल्ह्यातील चौदा नागरीक गेले होते. यातील आठ जनांना शासकीय वैद्यकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे तर शासकीय आयुर्वेदीक रुग्णालयात चौघांना इन्स्टीट्येशन कॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अजिबात घाबरण्याचे कारण नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. बाहेरगावचे मजूर तसेच विद्यार्थी जिल्ह्यात अडकेले आहेत. अशांना शाळा, हॉस्टेल आदी कॅम्पच्या माध्यमातून त्यांना राहण्याची, जेवणाची तसेच झोपण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. अशा नागरिकांच्या परिवारांनी चिंता करण्याचे कारण नाही. महसुल व पोलिस प्रशासनाचे अधिकारी त्यांची लॉकडाऊन संपेपर्यंत काळजी घेतील, असे ते म्हणाले. 

अनावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर
जिल्ह्यातील नागरीकांनी अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडले तर त्यांचे वाहन जप्त करुन त्यांच्या विरुध्द पोलिस प्रशासनाच्या माध्यमातुन जिल्हा प्रशासन कडक कारवाइ करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात महसुल, पोलिस, आरोग्य विभाग, महापालिका, सफाइ कामगार आदी दहा ते बारा हजार अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. 

विशेष कॅम्पमध्ये ८३० नागरिक
सध्या शहरात राज्य व जिल्ह्यातील एकूण ८३० नागरिक प्रशासनातर्फे उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये आहेत. त्यांच्या जेवनासह राहण्याची सर्व व्यवस्था स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातुन प्रशासन करत आहे. गोरगरीब वस्त्यांमध्ये शासनाच्यावतीने व स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना नियमीत राशन वाटपाच्या अतिरिक्त प्रति व्यक्ती पाच किलो तांदुळ आगामी तीन महिने मोफत देण्यात येणार असल्याचेही डॉ. विपीन यांनी सांगीतले.

दोन टमाटे अ्न दोन वांगे
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी लॉकडाऊन काळात नागरिक विनाकारण रस्त्यावर कसे फिरतात याचे उदाहरण दिले. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर व आपण एका दुचाकीस्वाराला अडवून फिरण्याचे कारण विचारले, असता त्यांने भाजीपाला आनन्यासाठी आल्याचे सांगीतले. त्यांची पिशवीची चौकशी केली असता त्यात दोन टमाटे व दोन वांगे आढळून आल्याचे सांगीतले. अशा विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरुध्द कडक कारवाइ करु असे डॉ. विपीन यांनी सांगीतले.
    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.