Fraud Crime: तत्कालीन प्रशासकीय संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Parbhani News: लीज प्रीमियम हेडखाली दोन लाख रुपयांच्या पावत्यांच्या कलर झेरॉक्स प्लॉटधारकांना देऊन मूळ मुख्य प्रशासकाने रद्द करून दहा लाख रुपयांचा अपहार केला
 तत्कालीन प्रशासकीय संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Fraud Crimesakal
Updated on

Crime News: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०२१-२२ या कालावधीतील अशासकीय मुख्य प्रशासक,अशासकीय संचालक मंडळाने खोटे व बनावट बिले, व्हाउचर तयार करून बाजार समितीच्या ३३ लाख ३७ हजार ४६६ रुपयांचा निधीचा अपहार केल्याच्या आरोपावरून तत्कालीन संचालकांह सचिव, अभियंता व रोखपाल आदी चौदा संशयितांविरुध्द गुरुवारी (ता.६) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संस्थेचे विद्यमान सभापती गंगाधरराव कदम बोर्डीकर यांनी फिर्याद दिली आहे.

तत्कालीन अशासकीय प्रशासक व संचालक कार्यरत असताना त्यांनी संगनमताने अवैध प्लॉट विक्री,प्लॉट शिल्लक नसताना बनावट प्लॉट तयार करून विक्री करणे, रोड लाइट, बाग बगिचाचा खर्च,बांधकाम खर्च,गोदामातील भंगार विक्री,प्रवास खर्च आदींमध्ये गैरव्यवहार करून ३३ लाख ३७ हजार ४६६ रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 तत्कालीन प्रशासकीय संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Nashik Fraud Crime : सोलर कृषीपंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची 10 लाखांची फसवणूक

संशयितांमध्ये मुख्य प्रशासक मनोज थिटे व प्रशासक शंकर जाधव,रूपेश चिद्रवार,जगदीश शेंद्रे, प्रकाश शेळके,दिलीप डोईफोडे,दिलीप घनसावध , प्रभाकर चव्हाण,कैलास सांगळे,हनुमंत भालेराव, मोहम्मद आबेद मोहम्मद गफार आणि अभियंता बोराडे,सचिव सतीश काळे, रोखपाल मंगेश शिंदे यांचा समावेश आहे.

असे केले गैरप्रकार

विवेक डुबेवार यांच्याकडून संचालक रुपेश चिद्रवार यांनी २१ लाख ५० हजार घेऊन केवळ दोन लाखांचा भरणा बाजार समितीला केला .सुंदरलाल सावजी बँकेला पाच प्लॉट लीजवर दिले असताना लीज रद्द न करता खोटे दस्तऐवज तयार करून प्लॉटच्या जागेमध्ये १०० फूट आणि ३० फूट क्षेत्रफळाचे सहा प्लॉट तयार करून ते प्लॉट श्रीराम जेथलिया , विवेक डुबेवार , प्रमोद कोल्हे , रेश्मा सोराठीया , गोविंद साबू , गणेश पोरवाल यांना वाटप केले. या प्लॉटधारकाकडून हस्तांतरण फी डेव्हलपमेंट फंड मार्क आउट चार्जेस २४ हजार, भाडेपोटी प्रत्येकी दोन लाख ९० हजार,लीज प्रीमियम प्रत्येकी दोन लाख अशा रकमा घेतल्या.परंतु लीज प्रीमियम हेडखाली दोन लाख रुपयांच्या पावत्यांच्या कलर झेरॉक्स प्लॉटधारकांना देऊन मूळ मुख्य प्रशासकाने रद्द करून दहा लाख रुपयांचा अपहार केला .

 तत्कालीन प्रशासकीय संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Nashik Cyber Fraud : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष; सायबर भामट्याकडून डॉक्टरला दीड कोटीचा गंडा

खड्डे बुजवणे,नाली बांधकाम करणे याची खोटी कागदपत्रे दाखवून पाच लाख २५ हजारांचा अपहार केला.अविक्रेय माल,लाइट,बागबगिचा इत्यादी खर्चाबाबत २०२१-२२ या आर्थिक वर्षात कोणत्याही वस्तूची खरेदीसेवा न करता व्यंकटेश प्लायवूड यांच्याकडून तीन लाख ९५ हजार ४२५ व पत्की झेरॉक्स यांच्याकडून तीन लाखांचे साहित्य खरेदी केल्याचे खोटी बिले सादर करून त्याचे पैसे लाटले.

#क्रमांक एक ते सातमध्ये फेरफार करून सर्व्हिस रोड १५ मीटरवरून १२ मीटरचा दाखवून सुधारित बनावट लेआउट तयार करून पणन संचालक पुणे यांची दिशाभूल करून बाजार समितीच्या सर्व्हिस रोडवर जिंतूर- येलदरी व जिंतूर वरूड या दोन मुख्य रस्त्याच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ही जागा बाजार समितीचे आहे , असे भासवून प्लॉट तयार करून ते वाटप केले . या प्लॉटधारकाकडून मोठ्या रकमा घेण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

 तत्कालीन प्रशासकीय संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Nashik Fraud Crime : पोलिस असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला सव्वा लाखाचा गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.