बीडमध्ये 216 जिवंत व्यक्तींना दाखवलं मृत, 50 हजारांसाठी गौडबंगाल?

corona death beed corona update
corona death beed corona updatesakal
Updated on

बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची खातरजमा करत असताना मोठा खुलासा झालाय. बीडच्या अंबेजोगाईत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची व्यक्तींचा खोटा आकडा समोर आला आहे. यामध्ये 216 जिवंत व्यक्ती मृत दाखवण्यात आल्या आहेत. आता हा आरोग्य विभागाचा गलथानपणा आहे की पैशांसाठीची हेराफेरी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (beed corona update)

216 जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अनेकांचे नातेवाईक मृत पावल्याने त्यांची कागदपत्रही घेण्यात आली नव्हती. या प्रकरणातही फेरफार केल्याची शक्यता वाढली आहे. नावं व्हेरिफिकेशन करताना या मध्ये नावांचा गौडबंगाल असल्याचं समोर आलंय. मृत व्यक्तींच्या डिटेल्स मिळवताना थेट जिवंत व्यक्ती समोर आल्या आहेत. (Beed Corona Deaths)

50 हजारांसाठी घोटाळा?

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारकडून 50 हजार रुपयांची मदत मिळते. ही मदत लाटण्यासाठी काही सरकारी बाबूंनी ही खोटी नावं तयार करून सरकारी आकड्यांमध्ये घुसवली, आणि त्यातून पैसे उकळले, असा संशय व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.