फर्निचरचे दुकान आगीत खाक; लाखोंचे नुकसान

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरातील एका फर्निचरच्या दुकानाला रविवारी (ता.दोन) पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत सदरील दुकान जाळून खाक झाले. 

परभणी शहरातील विसावा कॉर्नर, जिंतूर रस्त्यावर न्यू इंडिया नावाचे फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानाला रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराला आग लागल्याचे स्थानिक राहिवाशांच्या लक्षात आले. काहींनी तातडीने महापालिका अग्निशमन दलाला फोनवरून घटनेची माहिती दिली. आग विझविणारे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रोद्ररूप धारण केले होते. दुकान पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने आग चारी बाजूने बाहेर पडत होती. पहाटे ४ वाजता लागलेली आग ५ वाजेपर्यंत सुरूच होती. नानलपेठ पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक राहिवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, ही आग विजेच्या शार्टसर्किटने लागली असावी, असा अंदाज लावला जात आहे.

हेही वाचा - स्थायी समितीच्या सभापतीपदी गुलमीरखान


वंजारवाडी येथे धाडसी चोरी

पाथरी (जि.परभणी) : तालुक्यातील मुदगल ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी येथे चोरट्यांनी दोन घराचे कुलूप तोडून रोख रकमे सह सोन्या-चांदीचे दागिने, असा एक लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लांबवलाही घटना शुक्रवार (ता.३१) च्या मध्यरात्री घडली. दरम्यान, चोरट्यांचा मग काढण्यासाठी परभणीहुन शॉन पथक पाचारण करण्यात आले होते त्याचा फारसा उपयोग झाला नाही.


पाथरी तालुक्यातील वंजारवाडी येथील नारायण काशिनाथ मुंडे आणि महादेव बाबुराव मुंडे हे दोघे चुलत भाऊ आपापल्या परिवारासह घरात झोपले होते. चोरट्यांनी मध्यरात्री वस्तीवर प्रवेश करून या दोन्ही भावांच्या घराचे बाहेरून कडी लावून घेऊन नारायण यांच्या बाजूच्या घरातील बाजूच्या रुममध्ये ठेवलेली पत्र्याची पेटी उचलून जवळच्या शेतात नेऊन फोडली व त्यातील रोख ८० हजार, सोन्याचे १५ ग्राॅमचे व चांदीचे ७ तोळ्याचे दागिने, तर महादेव यांच्या घरातील १० ग्राॅम सोन्याचे दागिने, असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.

 शॉन पथक चोरांचा माग काढेल : शिंदे
पहाटेच्या वेळीही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, श्वान पथक व ठसेतज्ज्ञ यांच्या पथकाने वंजारवाडी येथील घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी नारायण मुंडे यांच्या फिर्यादीवरुन चोरट्याविरुध्द पाथरी ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, शॉन पथक चोरांचा माग काढेल, आशी माहिती पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.