Pankaja Munde: 'भावी उपमुख्यमंत्री पंकजा मुंडे'; माजलगावमध्ये कोणी लावले बॅनर? चर्चांना उधाण

Future Chief Minister Pankaja Munde: विधान परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाल्याचे घोषित झाल्यानंतर बीडमधील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.
Pankaja Munde
Pankaja Munde
Updated on

बीड- विधान परिषदेतील विजयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधान परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाल्याचे घोषित झाल्यानंतर बीडमधील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. आता माजलगावमधील काही उत्साही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचे अभिनंदनाचे पोस्टर लावले आहेत. यावर पंकजा मुंडे यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांचे बॅनर लागले आहेत. यावर लिहिण्यात आले आहे की, 'भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा भावी उपमुख्यमंत्री मा. पंकजाताई मुंडे यांचे हार्दिक अभिनंदन'. माजलगावच्या पंकजा मुंडे समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरजी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde: भाजपची खेळी यशस्वी! पंकजा मुंडे पुन्हा बनल्या आमदार, चाणक्यनीतीचा विजय?

भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. याआधी भाजपने पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरवले होते. पण, त्यांचा शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधान परिषदेला संधी द्यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली. भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : पावणेपाच वर्षे टळलेली संधी ‘टायमिंग’मुळे जुळली; आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित बांधून पंकजा मुंडेंना संधी

ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना संधी देऊन भाजपने वेगळा संदेश दिला असल्याची चर्चा आहे. याशिवाय पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता माजलगावमध्ये त्यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख करणारे पोस्टर लागले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.