Beed crime : गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार

Beed crime : बीड जिल्ह्यात अंभोरा येथे २५ वर्षीय गतिमंद तरुणीवर चार आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करून, न्यायालयाने तीन आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.
Gang rape of a mentally challenged woman in Beed
Beed Crime sakal
Updated on

आष्टी : बीड जिल्ह्यातील अंभोरा (ता. आष्टी) पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावामध्ये २५ वर्षीय गतिमंद व मूकबधीर तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. चार) उघडकीस आली. अंभोरा पोलिस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले आहे.

पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी सुरवातीला पीडितेच्या आई-वडिलांनी तक्रार देण्यास नकार दिला होता. पण पीडितेची वैद्यकीय तपासणी करून सरकारतर्फे पोलिस उपनिरीक्षक देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

दरम्यान, चारपैकी तीन आरोपींना रविवारी (ता. ६) आष्टी न्यायालयायासमोर उभे केले असता न्यायालयाने या तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौथा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या वयाबाबतच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.