गंगाखेड (जि. परभणी) : शेळगाव (ता. सोनपेठ) येथील एका बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी विष्णू मदन गोरे यास गंगाखेड (जि. परभणी) येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी मंगळवारी (ता. १८) फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा प्रथमच गंगाखेड जिल्हा न्यायालयाने सुनावली.
शेळगाव (ता. सोनपेठ) येथील पीडित बालिकेच्या आजोबाने नातीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार ता. २९ ऑक्टोबर २०१६ रोजी सोनपेठ पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर दोन दिवसांनी सदरील पीडित बालिकेचा मृतदेह विंश्वाभर लोंढे यांच्या विहिरीत गोणीमध्ये बाधून फेकून दिल्याचे आढळून आले. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली. यात आरोपी विष्णू मदन गोरे याने पीडित बालिकेवर अत्याचार करून अतिशय क्रूरतेने खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणी बालिकेवर अत्याचार करून क्रूरपणे ठार मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील प्रकरणी दोषारोत्र गंगाखेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सोनपेठ पोलिसांनी दाखल केले. त्यानंतर न्यायालयात सुनावणीसाठी प्रकरणाला सुरवात झाली. या प्रकरणी एकूण २३ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष घटनास्थाळाचे साक्षीदार, तपासी पोलिसाची साक्ष, वैद्यकीय अहवाल, हा पुरावा व गुन्हा सिद्ध करण्यासाठी ग्राह्यपूरक ठरला. तसेच सरकारी पक्षाने भक्कमपणे बाजू माडून वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी विष्णू मदन गोरे यास फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. एस. डी. वाकोडकर यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील डी. यू. दराडे, ॲड. एस. बी. पौळ यांनी सहकार्य केले.
हेही वाचा .... .
हेही वाचा - चक्क स्मशानभूमीत व्यायाम !
पेपर देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू
गंगाखेड (जि. परभणी) : इंग्रजी विषयाचा बारावीचा पेपर देऊन गावाकडे सायकलवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने परीक्षार्थी मारोती रामकिशन साबने याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लेंडेवाडी शिवारात (ता. पालम) मंगळवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजता घडली.
लेंडेगाव (ता. पालम) येथील जय भवानी महाविद्यालयातून मंगळवारी १२ वीचा इंग्रजी विषयाचा पेपर देऊन मारोती रामकिशन साबने (वय १७) हा गावाकडे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारा सायकलवरून परत जात असताना पाठीमागून मोटरसायकल (क्रमांक एमएच २४ - एआर ५४२७) वरून सुनील विश्वनाथ पवार व शेख शिराज शेख ईस्माईल (रा. चोवड, ता. पालम) यांनी सायकलला धडक दिली. यात मारोती साबने याच्या डोक्यास जोराचा मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर, मोटारसायकलवरील दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्या गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. या बाबत गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.