गंगाखेड (जि.परभणी) : गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण गंगाखेड (Gangakhed) येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांच्या संपर्कात गुट्टे आले होते. त्यांनी सोशल मीडियाद्वारे कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. परंतु तत्पूर्वी रविवारी (ता.नऊ) शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या (Parbhani) लोकार्पण सोहळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav), आमदार राहुल पाटील, बाबाजानी दुर्रानी, मोहन हंबर्डे, अमर राजूरकर, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, मुख्य अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. (Gangakhed MLA Ratnakar Gutte Tested Covid Positive)
या कार्यक्रमात गुट्टे हे उपस्थित होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे मंत्री, आमदार व गुट्टे यांनी स्नेहभोजन केले होते. स्नेहभोजना नंतर शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे देखील हजर होते. या घटनेमुळे ते अनेकांच्या संपर्कात आले आहेत. गुट्टे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले मंत्री व आमदारांसह अधिकारी व नागरिकांची चिंता वाढली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.