Accident : 'त्या' अपघातातील डॉक्टरांची अखेर प्राणज्योत मावळली

तीन मुलींचा बाप, चार बहीणींचा एकुलता एक भाऊ गेला
doctor dinesh kundhare
doctor dinesh kundharesakal
Updated on

गंगापूर - गाढेपिंपळगाव (ता. वैजापूर) येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिनेश छोटीराम कुंढारे (वय-४९) यांची संभाजीनगर येथील खासगी दवाखान्यात प्राणज्योत मावळली. मंगळवारी (ता. नऊ) येथील लासुर रोडवर तीन अल्पवयीन मुलांनी दुचाकी त्यांच्या अंगावर घालत पोबारा केला होता.

जखमी अवस्थेत संभाजीनगर येथील खासगी दवाखान्यात त्यांना दाखल केले होते. परंतु, डोक्याला जास्त मार लागल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले. डॉ. दिनेश कुंढारे मागील अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्यात नोकरीला होते. मागील चार महिन्यापूर्वीच त्यांची गाढेपिंपळगाव येथे बदली झाली होती. याविषयी अधिक माहीती अशी की, मृत डॉ. दिनेश कुंढारे यांनी रात्री सात वाजता कार्यालयाची ऑनलाइन मीटिंग केली.

रात्रीचे जेवण झाल्यावर साडे आठ वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी नेहमीप्रमाणेच घराबाहेर पडले होते. हॉटेल सह्याद्रि ते माऊली हॉस्पिटलपर्यंत जात असताना दुचाकीस्वरांनी त्यांना उडविले. यात डॉ. दिनेश कुंढारे गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळावरून अल्पवयीन मुलांनी पोबारा केला.

मात्र, प्रत्येक्षदर्शनींनी गाडीचा नंबर १६३९ येवढा लिहिला आहे. डॉ. दिनेश कुंढारे चार बहीणींचे एकुलते एक भाऊ होते. भाऊ आपल्याला सोडून गेल्याचे समजल्यावर चारही बहीणींनी टाहो फोडला. डॉ. कुंढारे यांना तीन मुली आहेत.

त्यातील एक मुलगी वंडर किड्स शाळा, गंगापूर येथे शिक्षिका आहे. तर दुसरी मुलगी बारावीत शीकते. तिसरी मुलगी मतिमंद आहे. त्यामुळे डॉ. कुंढारे तिच्यासोबत जास्त वेळ घालवयाचे. तीला खाऊ-पिऊ घालण्यापासून सर्व करायचे. चार बहीणींचा भाऊ आणि तीन मुलींचा बाप गेल्याने परिसरात शोककला पसरली आहे.

ऐनवेळी अवयवदानाचा निर्णय

डॉ. दिनेश कुंढारे यांचे मेहुणे दीपक लिंबे यांनी ऐनवेळी कुटुंबातील सदस्यांना समजावत एनवेळी अवयवदानाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. बुधवारी (ता. १०) अवयवदाणाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यावर गुरुवारी (ता. ११) बेगमपुरा येथे त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, आई असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.