गंगापूर : वाहेगाव (ता. गंगापूर) येथील तनुजा अरविंद मनाळ (वय : १०) या चिमुकलीने बुधवारी (ता. तीन) जगाचा अखेरचा निरोप घेतला. तनुजाला जन्मतःच अन्न नलिका व शौचाची जागाच नव्हती ती झाली तेंव्हाच ती जास्त काळ जगणार नाही असे डॉक्टरांनी स्पष्टच सांगितले होते.
पण, बापाची अखेरच्या श्वासापर्यंत लेकीला वाचवण्याची धडपड सुरूच होती. तनुजाचे वडील अरविंद मनाळ गंगापूर शहरात लॅब चालवितात. प्रत्येक महिन्याला इंजेक्शन व औषधींचा असा एकूण ३० हजारापर्यंत खर्च यायचा.
पण, अरविंद मनाळ डगमगले नाही. दिवसरात्र मेहनत करून त्यांनी तो संपूर्ण खर्च केला. एक, दोन महीने नाही तर तब्बल दहा वर्ष खर्च करत राहिले. यात त्यांनी मुलीचे अन्न नलिकेचे ऑपरेशन केले व शौचाची जागा देखील ओपरेशन केले.
दहा वर्षात तब्बल चाळीस लाख रुपये लेकीच्या उपचारावर खर्च झाले. पण तनुजा वाचली नाही. तीचा एक एक अवयव निकामी होऊ लागला. आणि गुरुवारी तीने जगाचा निरोप घेतला. तिच्यावर वाहेगाव (ता. गंगापूर) येथील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तीच्या निधनाने संपूर्ण गंगापूर शहरासह वाहेगावात शोककळा पसरली आहे. तीच्या पश्चात आई वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.
मुलीच्या शिक्षणासाठी अरविंद मनाळ यांनी गाव सोडले होते. ते गंगापूर शहरातच राहत होते. अरविंद मनाळ यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यामध्ये तनुजा मधली मुलगी. तनुजा शहरातील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी.
तनुजाला चित्रकला व वाचनाची आवड होती. यंदा शाळेत तीने पहिल्या पाच विद्यार्थ्यांत येण्याचा मान मिळवला होता. तीच्या जाण्याने फादर विल्फ्रेड सालढानायांचायसह शाळेतील मित्र, मैत्रिणी व शिक्षक वृंदानी दु:ख व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.