Success Story : शेतकरी आई-वडिलांच्या मुलांनी मेहनत, चिकाटीच्या जोरावर मिळविले पोलिस भरतीत यश

मोहसीन पठाण, जुनेद सुभान पठाण, जुनेद जमीर पठाण यांना भरतीत यश
gangapur village farmer sons success story got selected in maharashtra police
Success Story Sakal
Updated on

कायगाव : अगरवाडगाव (ता. गंगापूर) या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रयत्न, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर पोलिस भरतीत यश संपादित केले. मोहसीन गनीभाई पठाण, जुनेद सुभान पठाण, जुनेद जमीर पठाण यांची महाराष्ट्र पोलिसात निवड झाल्याने या तिघांचा शुक्रवारी (ता. १२) गावकऱ्यांतर्फे नागरी सन्मान करण्यात आला.

नाशिक शहर पोलिसमध्ये मोहसीन गनीभाई पठाण, तर जुनेद सुभान पठाण, जुनेद जमीर पठाण यांची मीरा भाईंदर (जि. ठाणे) येथे निवड झाली आहे. वसुसायगाव (ता. गंगापूर) येथील भाऊसाहेब गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, चिकाटीच्या जोरावर मिळविलेले हे यश वाख्याणण्याजोगे आहे.

गर्जे यांच्यासह पोलिस भरतीत सलेक्शन झालेल्या मुलांच्या आई-वडिलांवर संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कठीण परिस्थितीतून त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा जोरदार सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच अस्लम सय्यद, उपसरपंच बाळासाहेब वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बोकडिया, माजी तंटामुक्त अध्यक्ष युसूफ सय्यद, माजी सरपंच काकासाहेब म्हसरूप, भाऊसाहेब नवरंगे, माजी उपसरपंच अशोक म्हसरूप, ग्रा.पं. सदस्य बाबा शेख, नजीरखाँ पठाण, इरफान पठाण, इम्रान शेख,

जावेद शेख, विनोद बोकडिया, अकील पठाण, रब्बानी पठाण, नजीरनूरखाँ पठाण, अस्लम पठाण, मुजीब पठाण, हनिफ शेख, जफिक पठाण, अस्लम शेख लतीफ शेख, सरताज पठाण, सादिक शेख, आवेज पठाण, आबेद पठाण व इम्रान पठाण आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

अगरवाडगाव पोलिसांचे गाव

गावातील उच्चशिक्षित तरुण इरफान पठाण हे युवकांचे आयकॉन असून, ते मुलांना स्पर्धा परीक्षा आणि पोलिस भरतीसाठी प्रोत्साहन देत सतत मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत असिफ सय्यद, शाहरूख पठाण, विलास सुखधान, जमील शेख, मोहसीन पठाण, जुनेद जमीर पठाण, जुनेद सुभान पठाण या सात युवकांची पोलिस भरतीत निवड झाली आहे. आणखी सहा युवकांची पोलिस भरतीत निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगरवाडगाव आता पोलिसांचे गाव होऊ पाहात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.