कुंभार पिंपळगाव - दरवर्षी कुंभार पिंपळगावात डीजेच्या तालावर गणपतीची मोठी मिरवणूक निघते,ही मिरवणूक आठ ते दहा तास चालते. यावर्षी मात्र विविध गणेश मंडळांनी मिरवणुका न काढण्याचा निर्णय घेतला आणि कुंभार पिंपळगावमधल्या मानाच्या गणपतींचे सायंकाळी पाच वाजता विसर्जन झाले.
दरम्यान विठ्ठल गणेश मंडळाने आळंदी ते पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करीत आपली दरवर्षी ची परंपरा कायम ठेवली. दुपारी चार वाजता निघालेल्या दिंडीची सायंकाळी सहा वाजता सांगता झाली.