व्यवसायातून जोपासली भूतदया

kurula.jpg
kurula.jpg
Updated on


कुरुळा, (ता.कंधार, जि. नांदेड) ः आपणही निसर्ग आणि पर्यावरणाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून सुतारकाम या वडिलोपार्जित व्यवसायातून कुरुळा येथील नारायण पांचाळ या युवकाने उर्वरित टाकाऊ प्लायवूडच्या तुकड्यापासून भूतदया जागवत चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनविली आहेत. चिमणी संवर्धनासाठी आपण ही घरटी बनवत असल्याचे पांचाळने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा -  सापडलेल्या पैशातून ग्रंथभेट
नारायण बालाजी पांचाळ हा युवक मागील अनेक वर्षांपासून मूळचा वडिलोपार्जित असणारा सुतारकाम हा व्यवसाय मोठ्या बखुबीने चालवतो. ग्रामीण भागात पारंपरिक व्यवसायातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न नेहमीच नारायणकडून होतो. या व्यवसायातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबरच लाकडी वस्तू साकारताना आपल्या कौशल्याची एक वेगळीच चुणूक नारायण पांचाळ या तरुणाने इलेक्ट्रॉनिक कपाट बनवत दाखविली होती. सद्यःस्थितीस आधुनिकीकरणामुळे जैव वैविध्यास अडथळा निर्माण होत असल्याने अनेक जिवास जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यात वाढत्या भ्रमणध्वनीच्या वापरातील रेंजमुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत असल्याचे दृश्य आहे. 

तरुणाचे परिसरातून कौतुक
एकेकाळी अंगणात होणारा चिऊताईचा चिवचिवाट हळूहळू कमी होताना दिसत आहे. उन्हाळ्यात तापमानवृद्धी उष्माघातामुळे चिमण्यांच्या संघर्षाचा कायमस्वरूपी अंत होतो. या बाबींचा विचार करून नारायण पांचाळ या तरुणाने उपलब्ध चिमण्यांना कृत्रिम घरट्यांचा आधार देत पक्ष्यांप्रती भूतदया जागविली आहे. मागील दोन वर्षांपासून पांचाळ अशी घरटी बनवून भेट देत आहेत. या पर्यावरणस्नेहाबद्दल त्यांचे पक्षीमित्रांकडून कौतुक होत आहे. आजमितीस नष्ट होणारी वृक्षसंपदा, मोकळ्या जलस्रोतांचा अभाव आणि बदललेली घरांची बांधकामपद्धत यामुळे घरट्यांसाठी मर्यादा येत आहेत. याची प्रकर्षाने जाणीव होत आहे. ऊन, वारा, पाऊस व इतर अपदांपासून तिची अंडी व पिलांच संरक्षण व्हावं म्हणूनच मी अशी कृत्रिम घरटी तयार करण्याचे ठरविले, असे पांचाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ही कृत्रिम घरटी विविध शाळा, कॉलेजेस आणि पक्षीप्रेमींना भेट देणार असल्याचे मत पांचाळ यांनी व्यक्त केले. या भूतदयेबद्दल नारायण पांचाळ या तरुणाचे परिसरातून कौतुक होत आहे.



सर्व जीवजंतू आहेत म्हणून माणसे आहेत. दहा ते १५ वर्षांपूर्वी चिमण्यांची संख्या जास्त होती. आम्ही हातानी धान्य फेकले तर सहज पन्नास चिमण्या यायच्या. परंतु, आजघडीला चिमण्याची संख्या घटली आहे.
- दामोदर पांचाळ, सुतार कारागीर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.