चिमुकल्या गौरीने अर्ध्यावरच खेळाचा डाव सोडला, नातेवाईक मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले

Parli Beed Breaking News
Parli Beed Breaking News
Updated on

परळी वैजनाथ (जि.बीड): शहरातील महावितरण कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या हबीबपुरा येथील विजेच्या खांबात करंट उतरून एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे महावितरण कंपनीचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील हबीबपुरा भागात विजेचे खांब आहेत. या खांबाला गेल्या काही दिवसांपासून करंट उतरत होता.

येथील रहिवाशांनी यासंदर्भात महावितरण कंपनीस सुचना दिली. पण कंपनीच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मंगळवारी (ता.नऊ) दुपारी पावणे चार वाजता लहान मुले याठिकाणी खेळत असताना गौरी वैजनाथ घोटकर (वय ६) या मुलीस जोराचा करंट लागला. यातच या चिमुकलीचा जीव गेला.

या मुलीस येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या परिसरातील रहिवाशांनी महावितरण कंपनीतील दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुलीचा मृतदेह घेऊन नातेवाईक पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.