जिंतूर (जि.परभणी) : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढताना आणि परिस्थितीने खंगून गेलेल्या रुग्णांच्या मनाला उभारी देण्यासाठी आपले १२ इंची केस वडिलांच्या वाढदिवसाला दान करणारी तुळशी रमन तोष्णीवाल ही नेटकऱ्यांमध्ये दिवसभर चर्चेचा विषय बनली. आणि मग शहरातील शेकडो प्रतिष्ठितांनी तिचे प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले. हा प्रत्यक्ष अनुभव आहे शहरातील (Jintur) व्यापारी रमन तोष्णीवाल यांची इंग्रजी माध्यमात इयत्ता चौथ्या वर्गात शिकणाऱ्या नववर्षाच्या तुळशीची. केमोथेरपीमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या (Cancer Patient) केस जातात. या दुर्धर आजाराशी लढताना अनेक रुग्णांची समाजाकडून तेवढीच उपेक्षा ही होत असते. आर्थिक (Girl Give Unique Gift To Father On His Birthday, She Donate Hairs To Cancer Patients Parbhani) आणि शारीरिक त्रास सहन करताना अनेक रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी तुळशीचे बालमन तिला मात्र स्वस्त बसू देत नव्हते. (Parbhani)
तीन वर्षांपूर्वी परभणी येथे राहणाऱ्या आत्याने कॅन्सर रुग्णांना आपले केस दान केले होते. आणि ह्याच गोष्टीने तुळशीच्या बालमनात घर केले. आजोबा ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांचा समाजसेवेचा वारसा जन्मापासूनच तिला मिळाला. आपल्या लांब सडक केसांनी लक्ष वेधून घेणाऱ्या तुळशीने आत्या आणि आजोबाची प्रेरणा घेऊन वडिलांच्या वाढदिवसाला तिने आपले केस दान करण्याचा निर्णय घेतला. ११ डिसेंबर रोजी वडील रमन तोष्णीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त तिने आपले केस मंगळ आनंद रुग्णालय, चेंबूर, मुंबई यांना दान केले. दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या तुळशीच्या अभिनंदनासाठी मग काय, दिवसभर घराकडे लोकांच्या रांगा लागल्या होत्या.
स्वतःच्या वाढदिवसासाठी बाबांकडून गिफ्ट साठी हट्ट करून बसणाऱ्या मुलांपेक्षा बाबाच्याच वाढदिवसाला आपले केस दान करणारी तुळशी ही सर्वच लहान मुलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.