जातेगाव (जि. बीड) - अतिवृष्टी अन् गोदावरी नदीला पूर परिस्थितीत येताच, गेवराईतील गोदा काठच्या त्या ३२ गावातील ग्रामस्थांत धडकी भरत आहे. पूरपरिस्थितीने नागरिकांची झोप उडत असून, प्रशासनाच्या दरबारात या गावांच्या पुनर्वसनाचे भीजत घोंगडे कायमच आहे.
अतिवृष्टी अन् गोदावरी नदीला पूर परिस्थिती येताच गेवराईतील ३२ गावातील नागरिकांची झोप उडवून जाते.नदीला पाणी येताच शेती, पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पुर परिस्थिती कमी होताच रोगराईचा सामना येथील नागरीकांना करावा लागतो. २००५-०६ या वर्षी गोदावरीला जवळपास दोन ते अडीच लाख क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.