Balapur Accident : चतुर्थी निमित्त सत्य गणपतीला पायी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला अपघातात 2 ठार, 3 जखमी

सत्य गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पाच तरुण भाविकांना पाठीमागून ट्रकची धडक
going for lord ganesh darshan two killed in truck accident 3 injured hospital police balapur
going for lord ganesh darshan two killed in truck accident 3 injured hospital police balapursakal
Updated on

बाळापूर : चतुर्थी निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटा येथील सत्य गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पाच तरुण भाविकांना पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने या अपघातात दोन जण ठार झाले तर तीन जण जखमी झाल्याची घटना हिंगोली ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दाती फाट्याजवळ मंगळवारी ता. ३१ मध्यरात्री घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडे मिळाल्या माहितीनुसार मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटा येथील सत्य गणपतीला चतुर्थी निमित्त सखाराम शिंदे रा.आखाडा बाळापूर, मंगेश झांबरे‌, पांडुरंग काळे, गजानन देवराव काळे, दयानंद निर्मल सर्व रा.मरडगा ता.हदगाव जि.नादेड , देव दर्शनासाठी हे तरुण भाविक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाळापुर येथून पायाने जात होते बाळापुर पासून जवळ

असलेल्या दातीशिवारा जवळ पाठीमागून येणाऱ्या भरभरभाव वेगातील ट्रकने अचानक भाविकांना पाठीमागून धडक दिली ज्यामध्ये गजानन देवराव काळे वय ४० व दयानंद बाबुराव निर्मल दोन्ही रा. मरडगा जि. नांदेड हे गंभीर जखमी झाले व त्यांना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत घोषित केले.

तर सोबत असणारे सखाराम शिंदे, मंगेश झांबरे, पांडुरंग काळे हे जखमी झाले जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, तसेच या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाने अपघात घडल्यानंतर ट्रक सह पळून गेला. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार आणि माहिती देताना सांगितले की सदर वाहनाचा नंबर आला असून लवकरच पकडून त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.