Latur News : सोनसाखळी चोराला बीडमधून अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन लाखांचा मद्देमाल जप्त
latur
latursakal
Updated on

लातूर : गर्दीमध्ये गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्या एकाला बीडमधून अटक करण्यात आली आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चेन हिसकावणे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.

यात मुरूड पोलिस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या सभेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील लॉकेट चोरीची घटना घडली होती. त्यावरून मुरूड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेल्या सोन्याच्या लॉकेटसह उमेश सत्यवान टल्ले (वय ३३, रा. नूर कॉलनी) याला बीडमधील तेलगाव चौकातून पोलिसांनी अटक केली आहे.

त्याची अधिक चौकशी केली असता त्याने मुरूड येथील मनोज जरांगे यांचे सभेमधील एकाच्या गळ्यातून गर्दीचा फायदा घेऊन लॉकेट चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे ३३ ग्रॅम वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजू भोसले, पोलिस अंमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, रामहरी भोसले, प्रदीप स्वामी यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.