फोटो
फोटो

रेल्वेतील चोरट्याकडून साडेसहा तोळे सोने जप्त

Published on

नांदेड :  रेल्वे प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे किंमती सामान पळविणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून अडीच लाखाचे साडेसहा तोळे सोने व एक मोबाईल असा पावणेदोन लाखाचा ऐवज जप्त केला. ही कारवाई लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) केली. दोन्ही आरोपींना पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

नांदेड विभागातील विविध रेल्वे गाड्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या किंमती सामान चोरणारी टोळीने डोके वर काढले होते. त्यामुळे रेल्वे पोलिस चक्रावून गेले. प्रवाशांचे मोबाईल व महिला प्रवाशांच्या पर्स, त्यांचे दागिणे लंपास होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा पध्दतीचे गुन्हे नांदेड लोहमार्ग पोलिस ठआणय्त दाखल झाले आहेत. अशाच एका दाखल झालेल्या मोठ्या गुन्ह्यात तपास करून चोरट्यांना जेरबद करण्याचे मोठे संकट पोलिसांसमोर होते. 

लोहमार्ग पोलिसांची आठवड्यातील दुसरी कामगिरी 

मात्र अत्यंत चतुराईने व नियोजनबध्द गुप्त माहिती काढून पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांना माहिती देऊन रेल्वेत चोरी करणारे विमानतळ परिसरात राहणारा तसेच तो रेल्वे पोलीस ठाण्यात कलम ३७९, ३४ भादंविमधील आरोपी श्रीकांत भगत आणि अर्धापूर (जिल्हा नांदेड) येथील युनिस शेख यास सदर गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल २० तोळे सोने व कपडे किंमत अंदाजे साडेआठ लाखापैकी दोन लाख ६० हजाराचे साडेसहा तोळे वजनाचे सोने व एक बारा हजाराचा एक मोबाईल असा पावणेदोन लाखाचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींताकडून गुन्ह्यातील अजून मुद्मेमाल जप्त करायचा आहे व काही गुन्ह्याची कबूली करून घ्यावयाची असल्याची विनंती लोहमार्ग न्यायालय औरंगाबाद यांना करून पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करून दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांचे मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, मिलींद सोनकांबळे, पोलिस जिवराज लव्हारे, श्री. काळे, श्री. कराळे हे करीत आहेत.

रेसुब व जीआरपीत समन्वयाचा अभाव

नांदेड येथील रेल्वेस्थानकावर मागील काही दिवसापासून मोबाईल, पर्स पळविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशी भयभीत झाले आहेत. रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी याबाबीकडे गांभिर्याने पाहिले तर आरोपींच्या मुसक्या आवळणे काही अवघड नाही. मात्र या दोन्ही विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते. लोहामार्ग पोलिस आपल्या पध्दतीने आरोपीना पकडण्याचे काम करीत असून रेल्वेच्या संपतीचे रक्षण फक्त आमच्याकडे असल्याच्या भावना रेल्वे सुरक्षा बल व्यक्त करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()