Gopichand Padalkar : टोपेंनी 25 वर्षांत टोप्या घालण्याचे काम केलं; पडळकरांची टीका

Gopichand Padalkar and Rajesh TOpe
Gopichand Padalkar and Rajesh TOpe
Updated on

अंकुशनगर : राजेश टोपेंनी 25 वर्षात मतदारांना टोप्या घालण्याचे काम केले असून आता मतदारांनी 2024 मध्ये त्यांना टोपी घालावी, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाजनसंपर्क अभियान तसेच लाभार्थी संमेलन व जाहीर सभे दरम्यान केली.

यावेळी भाजपा प्रदेश निमंत्रीत सदस्य सुनिल आर्दड, अंकुश बोबडे, दिपक ठाकूर, शारदा पांढरे, ऍड विजय खटके, ऍड वैभव खटके, बंडू आराध्ये, अशोक तारख आदी उपस्थित होते.

Gopichand Padalkar and Rajesh TOpe
Crime : आश्चर्यम! पोलिस ठाण्यातील झाडपाला खाल्ला म्हणून बोकड मालकावर कारवाई

पुढे बोलतांना पडळकर म्हणाले की, राजेश टोपेंनी 25 वर्षात अंबड घनसांवगी तालुक्याचा विकासाच केला नाही. पाच वर्षांत एखादा सरपंच जिद्दीने राजधर्म पाळून गावाचा चेहरा मोहरा बदलतो. मात्र राजेश टोपे गेली 25 वर्षांपासून आमदार असून सुद्धा दर्जेदार रस्ते केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनतेचा विकास नको सत्ता पाहिजे ती पैशासाठी असे त्यांचे हे चक्र चालू आहेत.

पंतप्रधान मोदी हे 12 वर्ष गुजरातचे मुखमंत्री होते 9 वर्षापासून पंतप्रधान आहे पण भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. मात्र इतर पक्ष आरोप एकच ते चांगले कपडे घालतात. मोदीच्या 9 वर्षाच्या काळात अनेक राष्ट्राना कर्ज दिले. मात्र गेल्या चाळीस वर्षाच्या काळात देशाने इतर राज्याकडून कर्ज घेतले. मोदी सरकारच्या काळात संरक्षणामध्ये 83 देशाना शस्र निर्यात केले.

मोदीजी, देश म्हणजे कुटुंब असं देशासाठी काम करतात, बाकी लोक माझा कारखाना माझी शिक्षण संस्था ह्यांच्यासाठी काम करतात. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर ओबीसी बांधवासाठी बारा लाख भटक्या विमुक्त जातीसाठी पन्नास हजार व धनगर समाजासाठी पंचवीस हजार घरे या वर्षी देणार आहे.

Gopichand Padalkar and Rajesh TOpe
ShivSena Advertisement: जाहिरात देणारा 'तो' हितचिंतक कोण?; अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची खैरात

धनगर समाजासाठी महाराजा यशवंतराव होळकर व बंजारा समाजासाठी श्री संत सेवालाल महाराज, आदिवासी पाड्यासाठी संत बिरसा मुंडा या रस्ता योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने चार हजार कोटी रु निधी दिला असून ओबीसी मुला मुलींना 72 वसतिगृह चालू केले आहे. राजेश टोपे यांच्या गावात अहिल्यादेवी होळकर चौक केला असून राजेश टोपे व त्यांचा भाऊ म्हणतात कि चौक उखडून टाकू. राजेश टोपे यांना सांगतो कि चौक उखाडण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही तुम्हाला विधानसभेतून उखडून टाकू.

राजेश टोपे हे आरोग्यमंत्री असताना नोकरभरती व आरोग्य भरतीचा घोटाळा मी बाहेर काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्वतःला साखर सम्राट, सहकार महर्षी, शिक्षण महर्षी म्हणतात असा टोला राष्ट्रवादीला लगावाला. यावेळी या कार्यक्रमास घनसावंगी मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नारळ फोडया मंत्री म्हणून राजेश टोपेंच नाव आहे : सुनिल आर्दड

9 वर्षात 9 कोटी घरात गॅस देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. नारी सन्मान योजना आणून मुलगी जन्माला आली की 18 वर्षापर्यंत वेगवगळ्या टप्प्यात 25 हजार रुपये व 18 व्या वर्षी 75 हजार रुपये मिळणार या योजना आणल्या आहेत.

पाचव्यांदा राजेश टोपे आमदार झाले मात्र एकही रस्ता अंबड घनसवांगी तालुक्यात झाला नसल्याने नारळ फोड्या मंत्री म्हणून राजेश टोपेंचं नाव आहे. विकास व्हावा असं कधी टोपेना वाटलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.