Latur Cyber Crime : ‘पीएम किसान’च्या नावाने संदेश आलाय? थांबा! फेक लिंकमधून होऊ शकतो मोबाइल हॅक

Latur latest news In marathi | वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांना आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा लागत आहे. या योजनांचे संदेश शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होत आहेत. यातील बरेचसे संदेश हे किसान (KISAAN) नावाने येतात.
got message from PM Kisan be alert your mobile will hack through fake link
got message from PM Kisan be alert your mobile will hack through fake linkSakal
Updated on

लातूर : ‘पीएम किसान : लीस्ट एपीके फाईल’ या नावाचा संदेश तुम्हाला ‘व्हॉट्‌सॲप’द्वारे आला आहे काय, आला असेल तर तो ओपन करू नका. अशा फाइल पाठवून संबंधित व्यक्तीचे व्हॉट्‌सॲप हे हॅक केले जात आहे आणि मोबाईलमध्ये असलेले बँकिग ॲप आणि ऑनलाइन पेमेंट ॲप याची माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जात आहे.

असे प्रकार हल्ली वाढत असल्याने सायबर पोलिसांनी नागरिकांना विशेषत: शेतकरी बांधवांना ‘पीएम किसान’च्या नावाने आलेले अनोळखी संदेश ओपन करून पाहू नये, असे सल्ला दिला आहे.

वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांना आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा लागत आहे. या योजनांचे संदेश शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होत आहेत. यातील बरेचसे संदेश हे किसान (KISAAN) नावाने येतात.

त्यामुळे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी याच नावाचा वापर करीत शेतकऱ्यांना ‘टार्गेट’ करण्याचे ठरवले आहे, असे दिसून येते. म्हणून सायबर पोलिसांनी ‘पीएम किसान : लीस्ट एपीके फाईल’ असा संदेश व्हॉट्‌स ॲपवर आला तर त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन केले आहे.

‘व्हॉट्‌स ॲप’द्वारे ‘पीएम किसान : लीस्ट एपीके फाईल’ पाठविल्या जात आहेत. या बाबतच्या लिंकवर क्लिक केल्यास संबंधितांचे व्हॉटस् ॲप हॅक होत आहे. बँकिग ॲप, गुगल पे, फोन पे, ॲमेझॉन पे यांचे डिटेल्स व ॲक्सेस हॅकर मिळवत आहेत. यातून त्यांच्या बँक खात्यातील पैसे कपात होत आहेत. याबाबतच्या तक्रारी नांदेडमध्ये वाढत आहेत.

लातुरातही अशा तक्रारी येवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आधीच काळजी घ्यावी. सध्या ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना’ सुरू आहे. या योजनेच्या नावाने अनोळखी दूरध्वनी अथवा एमएमएस येऊन फसवणूक होवू शकते. त्यामुळे अशा दूरध्वनी अथवा एमएमएसला उत्तर देऊ नये, असे आवाहन सायबर विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी केले.

फसवणूक झाल्यास काय करावे...

आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या टोल फ्री क्रमांकावर तातडीने कॉल करावे. सुरवातीच्या दोन ते तीन तासांच्या आत या क्रमांकावर जर कॉल केला तर खात्यातून गेलेली रक्कम थांबवून ठेवता येते आणि ती रक्कम परतही मिळवता येऊ शकते.

याशिवाय, सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरही लेखी तक्रार करता येऊ शकते. त्याची तातडीने दखल घेतली जाते. संबंधित बँकेलाही याबाबतची माहिती देऊन खात्याचे सर्व व्यवहार थांबवून ठेवता येतात, असे दयानंद पाटील यांनी सांगितले.

... याकडे लक्ष द्या

  • आपल्या मोबाईलमधील इनस्टॉल अननोन ॲपला परवानगी देवू नका. सोर्स सेटिंग बंद करा.

  • अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. ती शेअर करू नका.

  • पीएम किसान बरोबरच बँकाच्या नावाने आलेल्या एपीके फाइल या डाऊनलोड करू नका

  • आपल्या व्हॉट्‌स ॲप प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्या

  • आपल्या बँक खात्याचे डिटेल्स, ओटीपी कोणाकडेही शेअर करू नये

  • आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या टोल फ्री क्रमांकावर तातडीने कॉल करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.