उस्मानाबादेत अधिकाऱ्यांची वानवा! रिक्त जागांचे प्रमाण वाढले

उस्मानाबाद जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. त्यामुळे येथील अधिकारी बीड, लातूर अशा जिल्ह्यात बदलून जातात. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री स्थानिक स्तरावर स्वतः प्रयत्न करून रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न करतात
Osmanabad
OsmanabadOsmanabad
Updated on
Summary

उस्मानाबाद जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. त्यामुळे येथील अधिकारी बीड, लातूर अशा जिल्ह्यात बदलून जातात. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री स्थानिक स्तरावर स्वतः प्रयत्न करून रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न करतात

उस्मानाबाद: जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, अनेक अधिकारी जिल्ह्यातून बदलून जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त जागांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यातील बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. विशेष म्हणजे मार्च महिन्यात कोरोनाची लाट येत असल्याने ऐन बदल्यांच्या वेळेत अडथळे येत होते. शिवाय कोरोना थोपविण्यास प्राधान्य देत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. मात्र काही विभागातून बदल्यांचे प्रस्ताव वेगाने पळविल्याने काही अधिकारी बदलून गेले आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या बदल्यांमुळे जिल्ह्यातील रिक्त पदांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बदलून येणारा अधिकारी येथे येऊन पदभार स्वीकारत नाही, तोपर्यंत येथील अधिकाऱ्यांना सोडू नये, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.

उस्मानाबाद जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. त्यामुळे येथील अधिकारी बीड, लातूर अशा जिल्ह्यात बदलून जातात. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री स्थानिक स्तरावर स्वतः प्रयत्न करून रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न करतात. शिवाय बीड आणि लातूर येथे स्थानिक जिल्ह्यातील आमदार असलेले पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना रिक्त पदांचा प्रश्न भेडसावत नाही. उस्मानाबाद जिल्हा आकाराने लहान आहे. शिवाय फारशी उलाढाल होत नाही. औद्योगिक, वैद्यकीय, शिक्षण क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे बडे अधिकारी जिल्ह्यात येण्यास तयार होत नाहीत. जिल्ह्यातून जाण्यासाठी त्यांचे वारंवार प्रयत्न सुरू असतात. त्यातच पदाधिकाऱ्यांकडून वारंवार दबावतंत्राचा वापर होत असल्याची ओरड अधिकारी वर्गातून होत आहे.

Osmanabad
NEET Exam 2021: ‘नीट’ला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

या विभागांत रिक्त जागा-
जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयात आठ उपअधीक्षक असतात. सध्या केवळ चारच उपअधीक्षक आहेत. शिवाय मोजणी करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. मोजणीची अनेक प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. याशिवाय महसूल विभागातही जागा रिक्त आहेत. नायब तहसीलदारांच्या १० तर तहसीलदार पदाच्या तीन जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेसह इतर विभागातही रिक्त जागांची संख्या वाढली आहे. काही अधिकारी येथून बदलून गेले आहेत. त्यांच्या ठिकाणी अन्य अधिकारी बदलून आले नाहीत. त्यामुळे विकास कामांना खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.